
Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | एकीकडे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) परिणाम देशावर जाणवत असतानाच महाराष्ट्रात मात्र तापमानात (Temperature in Maharashtra) वाढ होताना दिसत आहे. दुपारच्या उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भ (Vidarbha) आणि कोकणात (Konkan) उष्णतेच्या लाटेसारखी (Maharashtra Weather Update) स्थिती आहे. 15 जूनपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो.
गोव्यानंतर (Goa) 16 जूनच्या सुमारास मान्सून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (Maharashtra Weather Update) काही भागात उन्हाचा तडाखा बसत आहे. यातून लोकांना हाल सोसावे लागत आहे. सध्या जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे (Thane) तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), नंदुरबार (Nandurbar), धुळे (Dhule) भागात बिपोरजॉय वादळातील अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी 25 ते 30 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम या भागात जाणवेल, असे खुळे यांनी सांगितले.
केरळमध्ये सरासरी 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून (Monsoon) चार दिवस उशिरा येण्याची अपेक्षा होती. तो केरळमध्ये 1 जून ते 8 जून
दरम्यान कधीही येऊ शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) केले होते.
त्यानुसार मान्सूनने गुरुवार, 8 जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला आहे. या दाखल झालेल्या नैऋत्य मान्सूनने आगमनाच्या अटी पूर्ण केल्या आहेत.
तिची सर्वोच्च सीमा केरळमधील कन्नूर आणि तामिळनाडूमधील कोडाईकनाल तसेच आदिरामपट्टीनाम शहरातून जाते.
Web Title : Maharashtra Weather Update | Next five days of heat in Maharashtra;
Monsoon will have to wait till June 16
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात किंचित घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या
- MLA Varsha Gaikwad | काँग्रेसमध्ये भाकरी फिरली, भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन उचलबांगडी; वर्षा गायकवाड नवीन अध्यक्ष
- Maharashtra Politics News | एका पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत धुमसतंय?, MP श्रीकांत शिंदेंचा राजीनाम्याचा इशारा