वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावल्याने टोल नाक्यांवरील रांगा बंद !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, टोल प्लाजा व्यवस्थेला बंद करण्यात येणार नाही आणि राष्ट्रीय महामार्गवर टोल प्लाजावर लागणाऱ्या रांगेतील सर्व वाहनांवर चार महिन्यात अनिवार्य म्हणून फास्ट टँग लावण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यासंबंधित माहिती दिली आहे.

सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य –
लोकसभेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी संबंधित अनुदानाच्या मागणीवर होणारी चर्चाला उत्तर देताना सांगितले की, फास्ट टॅग लावल्याने टोल प्लाजावर टोल भरण्यासाठी लागणारी रांग बंद होईल. यामुळे पुढील चार महिन्यात सर्व वाहनांना अनिवार्य म्हणून हा टॅग लावण्यास सांगण्यात आले आहे. नवी वाहनांवर विक्री करतानाच हे टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

५८ लाख फास्ट टँग वितरित –
त्यांनी सांगितले की आता पर्यंत ५८ लाख फास्ट टँग वितरित करण्यात आले आहेत. हे टॅग लावण्यात आल्याने वाहनांना डिजिटल पद्धतीने टोल कर भरु शकतील. तसेच त्यांच्या टँगच्या माध्यमातून शुल्क आधीच कापले जात असल्यामुळे त्या वाहनांना टोल प्लाजावर थांबण्याची गरज भासणार नाही. राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाजावर वाहनांची लांब रांग लागणार नाही. यासाठी नव्या आणि आधिक उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

गडकरीने लोकसभेत बोलताना सर्व वाहनचालकांना आणि वाहन धारकांना आवाहन केले आहे की, पुढील काही महिन्यात लवकरात लवकर फास्ट टॅग लावावेत. या फास्ट टॅगमुळे टोल प्लाजावर होणारी वाहनांची गर्दी आणि जाणारा वेळ याची बचत होईल.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने