Gahunje Maval Murder Case | गहुंजेतील सुरज काळभोर खून प्रकरणाला वेगळं वळण, ‘या’ कारणावरून पत्नीनेच ‘गेम’ केल्याचं आलं समोर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Gahunje Maval Murder Case | पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील गहुंजे गावाच्या हद्दीत झालेल्या सुरज काळभोर खून प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे (Pune Pimpri Chinchwad Crime News). सुरज काळभोर (Suraj Kalbhor Murder Case) याचा मर्डर (Pimpri Murder Case) हल्लेखोरांनी केला नसून त्याच्या पत्नीनेच त्याचा गळा चिरून खून केल्याचं समोर आलं आहे (Murder In Pune). पत्नीनेच त्याचा खून झाल्याचा बनाव रचल्याचं देखील पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी पत्नीची उलट तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Gahunje Maval Murder Case)

अंकिता सुरज काळभोर (Ankita Suraj Kalbhor) असं पतीचा खून करणार्‍या पत्नीचं नाव आहे. तिने पती सुरज काळभोरचा खून केला आहे. सुरज हा अंकिताचा शारिरीक व मानसिक छळ (Crime Against Woman) करत होता. वेळावेळी होणार्‍या शारिरीक व मानसिक छळाला अंकिता वैतागली होती. त्या रागातून तिने पतीचा गेम केला आहे. (Gahunje Maval Murder Case)

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री सुरज काळभोरने अंकिताचा छळ केला.
वैतागलेल्या अंकितानं सुरजचा गेम करायचं ठरवलं. तिनं पतीला माहेरी म्हणजे गहुंजेला घेऊन जाण्याचे ठरविले.
आकुर्डी (Akurdi) येथील घरातून सुरज आणि अंकिता निघाले. त्यांनी प्रथम प्रति शिर्डीत साई बाबाचं दर्शन घेतलं.
गहुंजे येथील घरी जाण्यापुर्वीच ते आधी शेतात गेले. तिथं गेल्यावर अंकितानं लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला.

पती सुरज बेसावध असल्याचं तिनं पाहिलं अन् सोबत आणलेला चाकू तिनं बाहेर काढला. काही क्षणातच तिनं सुरजचा गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिलं.
शेतात असलेला टिकाव अन् दगड तिनं सुरजच्या डोक्यात घातला.
रक्ताच्या थारोळयात पडलेल्या सुरजचा मृत्यू झाला. दरम्यान, अंकितानं पती सुरजचा हल्लेखोरांनी खून
केल्याचा बनाव केला होता. पोलिसांच्या तपासाणीमध्ये गुढ बाहेर आलं आणि अंकिताने सुरजचा खून केल्याचे
स्पष्ट झाले. सूरज काळभोर हे आकुर्डी स्टार हॉस्पिटल (Star Hospital in Akurdi) मागे राहायला होते.

Web Title : Gahunje Maval Murder Case | The case of Suraj Kalbhor murder in Gahunje took a different turn, it came to light that the wife anikta played the ‘game’ because of ‘this’ reason.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

Pune Police News | पुणे पोलिस : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी निधन