Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Galactorrhea Cause Symptoms And Treatment | महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी (Women Health) घेणे खूप महत्वाचे आहे. उत्तम आरोग्य म्हणजे उत्तम आहार आणि उत्तम जीवनशैली. ताणतणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे (Women Health Care Tips) महिला नकळत अनेक आजारांना बळी पडतात (Galactorrhea Cause Symptoms And Treatment).

 

महिलांच्या काही समस्या अशा असतात ज्या त्या इतरांना सांगण्यास कचरतात. स्त्रियांच्या स्तनातून दूध येणे ही देखील एक अशी समस्या आहे जी त्या इतरांना सांगत नाहीत किंवा तिच्यावर उपचारही करत नाहीत (Galactorrhea Cause Symptoms And Treatment).

 

ज्या स्त्रिया गरोदर आहेत किंवा स्तनपान करत आहेत त्यांच्या स्तनातून दूध येणे सामान्य आहे, परंतु काही स्त्रिया गर्भवती नसतात किंवा स्तनपान करत नसतानाही त्यांच्या स्तनातून दुधाचा स्त्राव होतो (Galactorrhea).

 

स्तनातून दूध बाहेर पडणे हे गॅलेक्टोरियाचे लक्षण आहे. काही स्त्रिया स्तनातून येणारे हा द्रव कर्करोगाचे लक्षण मानतात आणि त्याच तणावात रोग वाढू देतात. तुम्हालाही अशाच प्रकारचा त्रास होत असेल तर या आजाराचे कारण, लक्षणे आणि तो आजार कसा टाळता येईल? ते जाणून घेवूयात (Know The Galactorrhea Causes, Symptoms And Treatment)…

गॅलेक्टोरिया का होतो (Why Galactorrhea Occurs) ?
ज्या महिलांच्या स्तनातून द्रव किंवा दुधासारखा पदार्थ बाहेर पडतो त्यास प्रोलॅक्टिनचे उत्पादन हे सर्वात मोठे कारण आहे. प्रोलॅक्टिनच्या जास्त उत्पादनामुळे स्तनातून दूध बाहेर येते.

 

पिट्यूटरी ग्रंथी ही एक लहान ग्रंथी आहे जी प्रोलॅक्टिनसह इतर अनेक हार्मोन्स तयार करते. जेव्हा पिट्यूटरी ग्रंथीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवते, तेव्हा अशा परिस्थितीत स्त्रियांना गॅलेक्टोरियाची समस्या उद्भवते. काही लोक या आजाराचा संबंध कर्करोगाशी जोडतात.

 

गॅलेक्टोरियाच्या त्रासाला जबाबदार कारणे (Causes Of Galactorrhea Distress) :

1. स्तन किंवा स्तनाग्र उत्तेजित होणे

2. अँटीसायकोटिक्स

3. अँटीडिपेंटेटस

4. हाय ब्लड प्रेशरच्या औषधांचे सेवन

5. किडनीचा जुना आजार

6. छातीच्या मज्जातंतूंचे नुकसान

7. हार्मोनमधील बदल

8. पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होणे

9. चुकीची जीवनशैली

 

गॅलेक्टोरियाची लक्षणे (Symptoms Of Galactorrhea) :

1. तीव्र डोकेदुखी

2. मासिक पाळीत असमानता

3. स्तनाग्रातून पांढरा किंवा लाल द्रव स्त्राव

4. दृष्टी कमी होणे

5. स्तनाच्या ऊतींचे प्रमाण वाढणे

6. सेक्स करण्याची इच्छा नसणे

7. चेहर्‍यावर मुरुम येणे

 

गॅलेक्टोरियाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट आहेत (What Are The Tests To Diagnose Galactorrhea) ?

गॅलेक्टोरियाची लक्षणे जाणवत असतील, तर सर्वप्रथम जीवनशैलीत बदल करा आणि काही टेस्टच्या मदतीने या आजाराच्या निदान करा.

 

हा आजार काही चाचण्यांद्वारे सहज शोधता येतो. या आजाराचे निदान करण्यासाठी गर्भधारणा चाचणी, हार्मोनल चाचणी, एमआरआय आणि मेमोग्राम किंवा सोनोग्राफी करता येते. या चाचण्यांद्वारे या आजाराचे सहज निदान होते.

हा आजार कसा टाळावा (How To Prevent This Disease)

तुम्ही कोणतेही औषध घेत असाल, तर डॉक्टरांच्या मदतीने औषध बदला.

हार्मोन्समधील चढ-उतार हे या आजाराचे कारण आहे, त्याचे औषध घ्या.

तुमची प्रोलॅक्टिन पातळी कमी करण्यासाठी औषधे घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol Symptoms | जेव्हा शरीरात दिसतील ‘हे’ 6 बदल तर समजून जा नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झाले जास्त; जाणून घ्या

 

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या