Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pimple Home Remedies | खूप लोकांना त्वचेच्या समस्या असतात. आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाणही वाढते आणि उष्णता वाढली की (Skin Care Tips), काहींना चेहऱ्यावर पिंपल्स येतात. (Pimple Home Remedies) काहीजण आपले पिंपल्सघालवण्यासाठी अनेक महागड्या क्रिम्सही वापरतात. परंतू त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. तर आज आम्ही तुमच्यासाठी पिंपल्स दूर करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत (4 Homemade Face Packs For Pimples Or Acne Problem).

 

– दही आणि बेसन फेस पॅक (Curd And Gram Flour)
दही आणि बेसनाचा फेस पॅक (Face Pack) पिंपल्सची समस्या दूर करू शकतो. हा पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगला आहे. यामुळे उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळतो. हा फेस पॅक सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. (Pimple Home Remedies)

 

– मेथीचा फेस पॅक (Fenugreek)
मेथीचा फेस पॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. पॅक बनवल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

– दही, मध आणि बेसन (Curd, Honey And Gram Flour)
दही, मध आणि बेसनाचा फेस पॅक त्वचेसाठी खूप चांगला असतो. हा फेस पॅक तुम्हाला मुरुमांसह मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदतकरू शकतो. हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात बेसन घ्या. नंतर त्यात एक चमचा मध आणि दही घाला. हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा.

 

– बेसन आणि मुलतानी माती (Gram Flour Multani Soil)
बेसन आणि मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करण्यासाठी प्रथम एक वाटी घ्या. त्यात बेसन आणि मुलतानी माती मिक्स करा.
यानंतर गुलाब पाण्याच्या मदतीने घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा वापरू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pimple Home Remedies | 4 homemade face packs for pimples or acne problem

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Black Pepper Benefits | काळी मिरी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Weight Loss | ‘या’ ज्यूसचे सेवन करून, पोटाची चरबी करा कमी; जाणून घ्या