Gandii Baat | ‘गंदी बात’ वेबसिरिजच्या पोस्टवरवरुन नवा वाद; देवी लक्ष्मीशी मिळतेजुळते पोस्टर बनवल्याबद्दल दिग्दर्शिका एकता कपूर सापडली वादाच्या भोवऱ्यात

पोलीसनामा ऑनलाइन – Gandii Baat | छोट्या व मोठ्या पडद्यावरील निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील एक मोठ नाव म्हणजे निर्माती व दिग्दर्शिका एकता कपूर. तिने अनेक हिट चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत. एकताने मनोरंजन क्षेत्रातील एक काळ गाजवला असून तिने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही (OTT) आपले काम सुरु केले. एकता कपूरचा (Ekta Kapoor) ‘अल्ट बालाजी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म देखील आहे. मात्र यावर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजमुळे एकता कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. (Gandii Baat)

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/nshuklain/status/1668462800799137793?s=20

एकता कपूरच्या ‘अल्ट बालाजी’ (Alt Balaji) या ओटीटी प्लॅटफॉर्मववर सर्वात जास्त ‘गंदी बात’ (Gandii Baat) ही वेबसिरीज पाहिली जाते. या वेबसिरीजचा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तो प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनचा पोस्टर आऊट झाला आहे. मात्र पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेली स्त्री आणि हिंदू देवता लक्ष्मी यांच्यामध्ये अनेक साम्य असल्याने एकतावर टीकेची झोड उठवली जात आहे.

‘गंदी बात’ सीझन 6 (Gandi Baat Season 6) च्या पोस्टरमध्ये एक स्त्री मादक पोझ देत उभी आहे. तिच्या चेहऱ्यावर पदर आहे. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेली ही स्त्री कमळामध्ये उभी असून तिच्या दोन्ही बाजूंना मोराचे चित्रही दिसत आहे. या पोस्टरमुळे लक्ष्मी देवीचा अपमान होत असल्याची टीका एकता कपूरवर केली जात आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/WhoIsKamalSingh/status/1668488278562201601?s=20

दिग्दर्शिका एकता कपूर ही तिच्या कटेंटमुळे नेहमी चर्चेत असते. या आधीही तिच्या ‘अल्ट बालाजी’ या
प्लॅटफॉर्मवरील एका सीरिजमध्ये भारतीय सैन्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्यामुळे तिच्यावर जोरदार
टीका झाली होती. आता देवीच्या साम्यामुळे ती पुन्हा वादामध्ये आली आहे.
यामुळे लोक #BanEktaKapoor #BanAltBalaji हे हॅशटॅग वापरून निषेध व्यक्त करत आहेत.
तिच्या या वागणुकीबद्दल एकाने ट्वीट करत लिहीले आहे की, “अल्ट बालाजी हा एकता कपूरचा प्लॅटफॉर्म आहे.
यांच्या नावात बालाजी आहे पण कामं फारच वाह्यात आहेत. त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण
सॉफ्ट पॉर्न कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. आता तर त्यांनी कहर केला आहे,
एका मादक महिलेला कमळावर बसवून त्यांनी हे थम्बनेल तयार केलं आहे.
हे फक्त मलाच आपत्तीजनक वाटतंय की तुम्हालाही तसंच वाटतंय?”

अनेक लोकांनी हे पोस्टर (Gandi Baat Season 6 Poster) पाहून एकता कपूरच्या या चॅनेल बाबत निषेध नोंदवला
आहे. व तिच्यावर जहरी टिका केली आहे. एकाने ट्वीट करत लिहीले आहे की“या बॉलीवूड गँगला केवळ
आपल्या संस्कृतीचा अपमान करता येतो”.

सिरीज रिलीज होण्याआधीच पोस्टरवरुन प्रेक्षकांच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजचा एक मोठा चाहतावर्ग आहे.
ग्रामीण भागातील काही आंबटशौकिन कथा या वेब सीरिजमधून मांडल्या जातात.
यावर एकता कपूर (Ekta Kapoor) काय प्रतिक्रिया देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Gandii Baat | netizens slams alt balaji upcoming web series gandi baat season 6 poster says ban ekta kapoor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | युती टिकवण्यासाठी भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टीनंतर स्विमींगसाठी गेलेल्या पोलिसाचा बुडून मृत्यू

Congress Mohan Joshi On Prakash Javadekar | पुण्याबद्दल आकस नसेल तर माजी मंत्री प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी