Ganesh Bidkar | भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना पुन्हा खंडणीसाठी फोन, खंडणी दिली नाहीतर राजकीय करिअर संपवण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ganesh Bidkar | भाजपच नेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना पुन्हा फोनवरुन धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आली. रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्यानंतर बिडकर यांनी तातडीने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिडकर यांना यापूर्वीही धमकीचे फोन करुन खंडणी मागितली होती.(Ganesh Bidkar)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गणेश बिडकर हे लष्कर परिसरात बागबान हॉटेल परिसरात होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने बिडकर यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. त्यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी (Pune Crime Branch) संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell) याचा तपास करीत आहेत.

गणेश बिडकर यांना यापूर्वी म्हणजेच मार्च 2023 मध्ये खंडणीसाठी फोन आले होते.
बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर तेव्हा व्हॉट्सअॅप कॉल करुन 25 लाखांची खंडणी मागितली होती.
त्यावेळी त्यांना शिवीगाळ करुन खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकू, बदनामी करु अशी धमकी दिली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar On BJP Modi Govt In Pune | मोदी सरकारने फक्त भाजपाला मोठे केले; जनतेला रस्त्यांवर आणले – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

Murlidhar Mohol Rally In Karve Nagar Pune | मुरलीधर मोहोळ यांची कर्वेनगर परिसरात प्रचारफेरी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Murlidhar Mohol Rally In East Pune | पुणे महायुती भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीने पूर्वेकडील पुण्यात पुन्हा संचारला उत्साह

Cop Dies Of Heart Attack While On Duty | पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराचा हृदविकाराने मृत्यू