Ganeshotsav 2022 | दुर्दैवी ! पुणे जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना 22 वर्षीय तरुण विहरीत बुडाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ganeshotsav 2022 | विघ्नहर्त्या गणेशाला राज्यात साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत असतानाच या आनंदादरम्यान पुणे जिल्ह्यात (Ganeshotsav 2022) एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील बोरीऐंदी (Boraindi Daud Taluka) ग्रामपंचायत हद्दीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुण विहिरीत बुडाला (Youth Drowned Well). ही घटना शुक्रवारी (दि.9) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार संकेत म्हेत्रे (Sanket Mhetre) असे विहिरीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संकेत पाण्यात बुडून तीन तासाहून अधिक काळ झाला असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे (Yawat Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार (Senior Police Inspector Narayan Pawar), पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले (PSI Padmaraj Gample) यांनी धाव घेतली. घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे.

 

आज गणपती विसर्जन (Ganesha Immersion) करताना (Ganeshotsav 2022)
तालुक्यातील इतर मंडळांनी काळजीपूर्वक गणपती विसर्जन करावे असे आव्हान बोरीऐंदी गावचे माजी सरपंच
(Former Sarpanch) राजेंद्र खंडेराव तावरे (Rajendra Khanderao Taware) यांनी केले आहे.

 

Web Title :- Ganeshotsav 2022 | 22 year old youth drowned in a well while immersing ganpati at boraiindi in daund taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

 

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

 

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स