MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Girl Love Jihad Case | मुंबईत याकूब मेमन (Yakub Memon) आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करुन भाजप (BJP) नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे (Maharashtra Police) खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु होता. तसेच या मुद्याच्या मार्फत शिवाय जातीय तेढ वाढण्याचाही प्रयत्न होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (NCP Spokesperson Mahesh Tapase) यांनी केला आहे. तसेच एका युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी अमरावती पोलिसांसोबत (Amravati Police) हुज्जत घातली होती, मात्र त्या युवतीने स्वत:हून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे अशा प्रकरणात कुणाला रस होता हे समोर आले असून या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नवनीत राणांसारख्या (MP Navneet Rana) नेत्यांवर कारवाई करण्याची भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेणार का? असा सवाल राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) एक युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन खासदार नवनीत राणा पोहोचल्या होत्या. त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यातच पोलिसांसोबत हुज्जत घातली. मात्र ती युवती स्वत:च्या मर्जीने घरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाल्याने राणा तोंडघशी पडल्या. त्यानंतर पोलिसांच्या संघटनेने नवनीत राणांचा जाहीर निषेध केला. नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रमाणे गुन्हा (FIR) दाखल व्हावा. तसेच वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी देखील महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या (Maharashtra Police Recruitment Association) वतीने करण्यात आली आहे. या वादात उडी घेत अशा प्रकारे धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई करणार का? असा सवाल तपासे त्यांनी उपस्थित केला.

माझी बदनामी थांबवा

अमरावतीचं प्रकरण हे लव्ह जिहादचं (Amravati Love Jihad Case) असल्याचं भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी
(BJP Spokesperson Shivarai Kulkarni) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी
ठासून सांगितलं. मात्र पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिचा साताऱ्यात आणि अमरावतीत जबाब नोंदवला.
यावेळी मुलीने माझ्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
मी माझ्या काही वैयक्तिक कारणांनी गेली होती. मला कोणीही पळवून नेलं नव्हतं.
माझी बदनामी थांबवा, असं सांगत खासदार राणा यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे.

Web Title :- MP Navneet Rana | MP navneet rana amravati girl love jihad case row ncp demands action to be taken against mp as she was loud to police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स

Amravati Love Jihad Case | काल पोलिसांना जबाब, आज तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप, माझी बदनामी थांबवा… लव्ह जिहाद बनावट!