Ganeshotsav 2022 | जर्मनीत पारंपरिक आणि पर्यावरण पद्धतीने गणेश विसर्जन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात गणेश उत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या धूमधडक्यात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवावर साजरा होत असताना परदेशात देखील गणेशोत्सव उत्साहात (Ganeshotsav 2022) साजरा करण्यात आला. आज अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. जर्मनीतील (Germany) एरलांगन शहरात (Erlangen City) देखील प्रथमच ढोल, ताशाच्या गजरात आणि शेकडो भारतीय नागरिकांच्या (Indian Citizen) उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

 

मराठी विश्व फ्रांकेन जर्मनी (Marathi Vishwa Franken Germany) तर्फे आयोजित केलेल्या या मिरवणुकीत (Ganeshotsav 2022) अठरा जणांच्या ढोल, ताशा व झांज पथकासोबत 38 महिला व पुरुष गटाने लेझीम नृत्य सादर केलं. तर छोट्या मुलांनी थोर भारतीय महापुरुषांची वेशभूषेत देखावे सादर करत उपस्थितांना ‘मिनी इंडिया’चे दर्शन घडवलं. विशेष म्हणजे विसर्जनचा हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील सरकारी कार्यालयच्याच्या समोर आयोजित करण्यात आला होता.

 

 

या निमित्ताने प्रथमच जर्मनी आणि युरोपचा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो तिथे आपला भगवा ही फडकला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जर्मन स्थित सर्व भारतीयांनी मनापासून सहकार्य केले आणि या
सहकार्यास जर्मनीच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात जवळपास आठशे लोकांनी सहभाग नोंदवला.
हे घडवून आणल्या बद्दल मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे
संस्थापक रश्मी गावंडे (Rashmi Gawande), तृप्ती सपकाळ (Tripti Sapkal),
अमोल कांबळे (Amol Kamble), प्रशांत गुळस्कर (Prashant Gulskar) यांचे कौतुक होत आहे.

 

Web Title :- Ganeshotsav 2022 | Ganesh Immersion in Germany in traditional and eco way

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

 

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

 

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स