गोवंडीत तरुणीवर सामुहिक बलात्कार, दोघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोवंडीमध्ये एका तरूणीला नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याप्रकरणात दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केली आहे. अमजदअली मोहम्मदजमा खान (वय-30), नूर मोहम्मद नजीर शेख (वय-42) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा पेंटर तर शेख हा चालक आहे. परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी खान याने लग्नाचे आमिष दाखून जवळीक साधून तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. त्यानंतर तो तिला ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवू लागला. तिला सहा सप्टेंबरला मानखुर्दमधील एका सोसायटीत बोलावून घेतले. त्याठिकाणी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खान आणि शेख यांनी तिच्यावर बलात्कार केला.

तिने घडलेला प्रकाराबाबत शनिवारी पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान आरोपी फरार झाले. सोमवारी रात्री खान आणि शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर सामुहिक बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॉम्बे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You might also like