Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

चार हजार चौ.फुटांचे टाईल्सचे शोरूम हटविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gangadham Hilltop Hill Slope Zone | महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील (Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone) बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोपवरील (Bibvewadi Hilltop Hill Slope Zone) बेकायदा गोदामांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत बुधवारी चार हजार चौ.फूटांचे टाईल्सचे शोरुम पाडण्यात आले आहे. तर लवकरच उर्वरीत गोदामांवर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा गोदामे पाडण्याच्या खर्चाचा बोजा संबधित मिळकत मालकांच्या मिळकत करामध्ये चढविण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याने दिली. (Gangadham Hilltop Hill Slope Zone)

गंगाधाम शत्रुजंय मंदिर (कोंढवा) रस्त्याच्या दुतर्फा मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि शोरूम्स झाली आहेत. हा परिसर हिलटॉप हिलस्लोप असून येथे बांधकामाला परवानगी नाही. यानंतरही सुमारे १०० हून अधिक छोटी मोठी गोदामे आणि दुकाने उघडण्यात आली आहे. या गोदामांवर महापालिका सातत्याने कारवाई करत आहे. तसेच मिळकत कर विभागाने त्यांना तीनपट कर आकारणी केली आहे. मात्र, यानंतरही बेकायदा कामांना कुठलाही चाप बसलेला नाही. मध्यंतरी येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी प्रचंड नुकसान झाले आहे. आगीच्या घटनांच्यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्यादेखिल घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत, एव्हढी बजबजपुरी माजली आहे. (Gangadham Hilltop Hill Slope Zone)

दरम्यान, बुधवारी प्रकाश मुथा या व्यावसायीकाचे सुमारे ४ हजार चौ.फूटांचे टाईल्सचे शोरूम बांधकाम विभागाच्यावतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उमेश शिद्रुक यांनी दिली. शिद्रुक यांनी सांगितले, की येथील बेकायदा बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात येथील काही व्यावसायीकांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. नेमक्या कोणत्या व्यावसायीकांनी स्थगिती मिळविली आहे, त्या प्रकरणांची न्यायालयातून माहिती घेण्यात येत आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कायदेशीर मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतू स्थगिती नसताना महापालिकेने नोटीस बजावूनही त्याला प्रतिसाद देत नाहीत, अशा व्यावसायीकांची शोरुम्स आणि गोदामे पाडण्याचे काम पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार आहे.

येथील बरीच शोरूम्स आणि गोदामे भाडेकराराने दिली आहेत.
भाडेकरूंनी त्यांचे भाडेकरार लवकरात लवकर विखंडीत करून अनधिकृत मिळकतीतील व्यवसाय बंद करावा.
ही बांधकामे पाडण्यासाठी प्रशासनाला येणार्‍या खर्चाचा बोजा हा संबधित जागा मालकांच्या मिळकत करांवर
चढविण्यात येणार आहे, असे आवाहनही शिद्रुक यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर,
स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू; चाकण येथील घटना

पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार