Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार

पुणे : Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाने खुशखबर दिली आहे. येत्या २४, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरच्या रात्री, वाईन शॉप (Wine Shop) मध्यरात्री १ पर्यत सुरू राहणार आहेत. तर बीअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे मद्यप्रेमींना ख्रिसमस (Christmas) आणि थर्टीफर्स्ट (31 December Party) धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. (Pune News)

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी २४, २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री पुणे शहरातील वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तसेच बीअर बारला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. (Pune News)

महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (ख) (सी), कलम १४२ (२), (एच-ख) (आयव्ही) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ तसेच ३१ डिसेंबरला राज्यातील मद्यविक्री परवानाधारक वाईन शॉप तसेच बीअर बार रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सरकारची धडधड वाढली, जरांगे २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमवर ठाम, म्हणाले, ”कोरोनाच्या नावाखाली…”

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांचे धक्कातंत्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत, सरकारवर उपरोधिक टीका!

Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना पोलीस अधिकाऱ्याचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक पोलीस दल हळहळले

Vijay Wadettiwar On Sanjay Raut | ‘शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवणार’, राऊतांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…