सौरव गांगुलींना मिळणार आज रुग्णालयातून ‘ डिस्चार्ज’

कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना आज गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयाने काढलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या नियमित रक्ताच्या चाचणीचा अहवाल समानधानकार आहे. इकोकार्डियोग्राफीमध्ये डावी वेंट्रिक्युलशर फंक्शन सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

छातीत अस्वस्थ वाटू लागणे, मळमळणे, उलट्या होत असल्याने गांगुली यांना २ जानेवारी रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर तातडीे अँजिओप्लास्टी केली होती. गांगुली यांना बुधवारीच रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. परंतु, त्यांनी आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

माजी कर्णधाराची हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतर रोज घरीच त्याचे परिक्षण केले जाईल, असे वुडलँड्स हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसू यांनी सांगितले.