गुन्हे शाखेकडून गांजाची तस्करी करणारी टोळी गजाआड

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती शहरात गाजांची विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून ८ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एमआयडीसीमध्ये सापळा रचून करण्यात आली.

नविनकुमार पांडू जाटू, किसन सैदा नाईक लावरी, राकेश धर्मा लावरी (सर्व रा. हैद्राबाद), उमेश लक्ष्मण गायकवाड( रा. बीड), अनिल राजू गायकवाड (रा. तांदुळवाडी वेस बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक टोळी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस स्वप्नील अहिवळे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारा पथकाने बारामती एमआयडीसीमध्ये सापळा रचून इरटीका (टीएस २९ बी ९६९८) कारची संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी गाडी आडवून गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीमध्ये ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा मिळाला. पोलिसांनी कारसह पाच जणाना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तेलंगणा राज्यातील पासिंग असलेली ८ लाखांची कार जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे तसेच बारामती गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वनिल अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

You might also like