‘किंग’ खानचा लाडका ‘अबराम’नं केलं स्टायलिश ‘फोटोशुट’ ! लवकरच करणार चाईल्ड आर्टीस्ट म्हणून डेब्यू ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लाडका अबराम खान सध्या चर्चेत आला आहे. शाहरुखची पत्नी गौरी खाननं नुकतेच इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेलच की आता हे फोटो कोणाचे आहेत. हे फोटो गौरीचे नाही तर तिच्या लाडक्या अबरामचे आहेत. सध्या हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. अबराम फोटोशुट केलं आहे ज्याची सोशलवर चर्चा सुरू आहे.

लाडक्या अबरामचे फोटो शेअर करताना गौरीनं खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये गौरी म्हणते, “Guessing he loves the camera !!!” एका दिवसातच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. सध्या त्याची सोशलवर चर्चा आहे.

खास बात अशी की, बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर, करिना कपूर, अनन्या पांडे तसेच मलायका अरोरा यांच्यासह अनेक कलाकरांनी या फोटोवर कमेंट करत अबरामचं कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6iW6nqqlDy/

अबरामचे हे फोटो पाहता अंदाज लावला जाऊ शकतो की, अबराम चाईल्ड आर्टीस्ट म्हणून सिनेमात डेब्यू करण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/B1ofDdAoksD/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/