सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी ग्रुप नवीन सेक्टरमध्ये उतरण्याची तयारी करत आहे. हा ग्रुप आता सिमेंट सेक्टरमध्ये उतरेल. पोर्ट आणि एयरपोर्ट सारख्या सेक्टरमध्ये अदानी ग्रुप अगोदरपासून आहे. शेयर बाजारांना दिलेल्या माहितीत ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेस ने म्हटले की, ग्रुपने अदानी (Gautam Adani) सिमेंट च्या नावाने एक फुल्ली-ओन्ड कंपनीची स्थापना केली आहे.

रेग्युलेटरी फायलिंगमध्ये अदानी एंटरप्रायझेसने म्हटले आहे की, अदानी सिमेंटमध्ये अदानी कॅपिटलचे 10 लाख रुपयांचे अथॉराईज्ड शेयर कॅपिटल आहे.

5 लाख रुपयांचे पेड-अप शेयर कॅपिटल आहे. या नवीन कंपनीत 10 रुपये फेस व्हॅल्यूचे 50 हजार इक्विटी शेयर आहेत.

अदानी सिमेंटला 11 जूनला गुजरातच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमध्ये रजिस्टर्ड करण्यात आले आहे, कंपनीने आपला व्यवसाय अजून सुरू केलेला नाही, यामुळे सध्या तिचा कोणताही टर्नओव्हर नाही.

अदानी एंटरप्रायझेसने म्हटले की, अदानी सिमेंट सर्व प्रकारच्या सिमेंटचे उत्पादन आणि विक्री करेल.

मार्केट एक्सपर्टचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारने कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये वाढ केल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी गौतम अदानी यांनी सिमेंट सेक्टरमध्ये पाऊल टाकले आहे.

एक्सपर्टचे म्हणणे आहे की, कंपनी पोर्ट आणि एयरपोर्ट बिझनेसप्रमाणे वेगाने छोट्या-छोट्या सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण करू शकते.

या कंपन्यांशी होणार अदानी सिमेंटची स्पर्धा

या सेक्टरमध्ये अदानी सिमेंटची स्पर्धा एसीसी सिमेंट, लाफार्ज, जेके सिमेंट, जेके लक्ष्मी सिमेंट, अंबुजा सिमेंट सारख्या कंपन्यांशी होईल.

कंपनीच्या स्थापनेनंतर अदानी ग्रुपचा कारभार आता एफएमसीजी पासून एयरपोर्ट आणि पॉवर ट्रान्समिशनपासून सिमेंटपर्यंत पसरणा आहे.

गौतम अदानी यांची संपत्ती या वर्षी 43 बिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 3.15 लाख कोटी रुपये वाढली आणि ते आशियाचे दुसर्‍या नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे संभाजीराजे समजतात, पण…’

 

गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या

 

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन रुग्ण, तर 14,910 जणांना डिस्चार्ज

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gautam Adani | adani group forays in to cement sector and lays foundation of adani cements