Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे संभाजीराजे समजतात, पण…’

इस्लामपूर : ऑनलाइन टीम – खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) हे राजे आहेत. ते आमचे देखील नेते आहेत. परंतु आपण भाजपचे (BJP) खासदार आहोत का, यासंदर्भात त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे (confusion in the mind). राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदोपत्री भाजपचे खासदार (BJP MP) आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. पेठनाका येथे पत्रकार परिषदेमध्ये (Press conference) ते बोलत होते.

आम्हाला चालढकल मान्य नाही
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले की, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावर कोणतेही आंदोलन (Movement) करावे, आम्ही त्यांच्यासोबत राहू. परंतु, आम्हाला चालढकल मान्य नाही, असे मत देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच राज्य सरकारला (State Government) वाचवायचे का मराठा समाजाला (Maratha community), याचा आगोदर विचार करुन खा. संभाजीराजे यांनी निर्णय (Decision) घ्यावा, असाही सल्ला त्यांनी दिला.

त्यांची भूमिका संशय निर्माण करणारी
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर वेळोवेळी भूमिका बदलली. त्यांची बदलेली भूमिका संशय निर्माण करणारी आहे. पहिल्यांदा कोल्हापूरातून (Kolhapur) मोर्चा काढणार असे म्हटले. त्यानंतर आमदार-खासदारांना जाब विचारू, असे म्हटले. आमदार-खासदारांना (MLA-MP) प्रश्न विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का, यासाठी सरकारला धारेवर धरले पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुम्ही राज्य सरकारला वाचवताय का ?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे काढण्याचा निर्णय रद्द करुन तुम्ही राज्य सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात का, हे देखील समजले पाहिजे. आधी मूक मोर्चा, तर कधी लाँग मार्च काढण्याची भूमिका घेत या प्रश्नावर चालढकल केली जात आहे, ती आम्हाला मान्य नाही. जे कोणी मराठा समजाच्या आरक्षणासाठी मोर्चे काढतील, आंदोलन करतील, त्यांच्यासोबत आम्ही राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

म्हणजे वाघ जंगलात नसून पिंजऱ्यात
वाघाशी दोस्ती करण्याच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पिंजऱ्यातल्या (cage) वाघाच्या (tiger) मिशीला हात लावायला या, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, राऊत असे म्हणत आहेत, म्हणजे वाघ जंगलात नाही तर पिंजऱ्यात आहे, हे त्यांनीच मान्य केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे राऊत यांचे आभार, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवारांचा पत्ता चुकला वाटतं
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे (Central Government) लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक कोटी पत्रे (One crore letters) पाठवणार असल्याचे सांगितले.
हीच पत्रे त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवायला सांगितली पाहिजे होती.
कदाचित त्यांनी यामध्ये लक्ष घातले असेत.
परंतु शरद पवार यांचा पत्ता (Address) चुकला असे वाटते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Wab Title :- whose mp are you confusion sambhaji rajes mind chandrakant patil

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा