‘माझा होशील ना’ मधील सई आणि आदित्य हिमाचलमध्ये करतायेत ‘मस्ती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रसिकांची लाडकी मालिका ‘माझा होशील ना’ दिवसेंदिवस आणखी रंजक होत चालली आहे. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीपासून रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.दिवसेंदिवस मालिका आणखी रंजक होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत.

गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे. गौतमी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमधील फोटो शेअर करत प्रेक्षकांनी वाहवा मिळवत असते.

गौतमी सध्या मनालीमध्ये शूटिंगसाठी गेली आहे. तिकडेच फोटो आणि व्हिडीओ तिने आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये तिच्यासोबत विराजस कुलकर्णीसुद्धा दिसतो आहे. ‘माझा होशील ना’च्या शूटिंगसाठी दोघे मनालीला गेले आहेत. गौतमी बर्फात एन्जॉय करताना दिसते आहे. काही वेळातच तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहेत.