Gautami Patil | गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील ‘मी करते तुम्हाला मुजरा’ लावणी रिलीज ; पहा व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन : गौतमीने (Gautami Patil) आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावले. आपल्या नृत्याने आणि सौन्दर्याने सर्वांना घायाळ केल्यानंतर आता गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. गौतमीची ‘घुंगरु’ या चित्रपटातील पहिली लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मी करते तुम्हाला मुजरा’ असे या लावणीचे नाव आहे. ‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आहे.

‘मी करते तुम्हाला मुजरा’ या लावणीतील गौतमीचा ठसका आणि ढोलकीची थाप यामुळे ही लावणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या गाण्यातील गौतमीचा साजशृंगार खूपच लक्षवेधी आहे. लाल रंगाचा जरीचा काठ असलेली पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, साज, केसात गजरा, नथा अस गौतमीच मनमोहुन टाकणार रूप दाखवण्यात आलं आहे. या गाण्यात गौतमीने घातलेल्या ब्लाऊजवर ‘सबसे कातील गौतमी पाटील’ असे लिहिलेले आहे. ‘मी करते तुम्हाला मुजरा’ ही लावणी साईनाथ पाटोळे आणि मारुती सोनू यांनी लिहिली आहे. वैष्णवी आदोडेने ही लावणी गायली आहे. तर महेंद्र बनसोडेने गौतमीची लावणी कोरिओग्राफ केली आहे.

‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातील सोलापूर, माढा आणि हंपी इतकंच नव्हे
तर थेट परदेशात थायलंडमध्ये तिच्या या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पडलं आहे.
या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन बाबा गायकवाड यांनी केले आहे.
शिवाय चित्रपटात गौतमी (Gautami Patil) सोबत हेच मुख्य कलाकार म्हणून झळकणार आहेत.
यांच्या व्यतिरिक्त शीतल गीते, सुदाम केंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, वैभव गोरे हे कलाकार देखील
चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारतील. कलावंत आणि त्यातही लोककलावंतांच्या आयुष्यावर कटाक्ष टाकणारा
हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का, यावरच आता अनेकांचं लक्ष आहे.

Web Title :- Gautami Patil | gautami patil upcoming marathi movie me karte tumhala mujra lavani viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’