Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’

पोलीसनामा ऑनलाईन : Onkar Bhojane | ‘सरला एक कोटी’ या नितीन सुपेकर दिग्दर्शित चित्रपटात ओंकार भोजने, ईशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं लक्ष्यात येत.सत्य घटनेवरून प्रेरित होऊन लिहिला गेलेला ‘सरला एक कोटी’ हा सिनेमा त्या प्रत्येक ‘कौरव’वृत्तीच्या पुरुषाच्या आणि आपल्या पत्नीला सारीपाटाच्या डावावर जुंपणाऱ्या पांडवांच्या कानशिलात चपराक लगावणारा आहे. या चित्रपटात दाखवलेली स्त्री ही आजची ‘बलशाली स्त्री’ आहे. (Onkar Bhojane)

‘सरला एक कोटी’ हा चित्रपट 20 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ओंकार भोजने आणि ईशा केसरकर यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या सेटवरील बऱ्याच गंमतीजमती सांगितल्या आहेत. या मुलाखतीदरम्यान he or she असा सेगमेंट होता ज्यात काही प्रश्न विचारता त्याचे he or she मध्ये त्यांना उत्तर द्यायचे होते. (Onkar Bhojane)

ओंकार आणि ईशा या दोघांना या सेगमेंटमध्ये बरेच प्रश्न विचारण्यात आले जसे की “तुमच्यात खवैय्या कोण आहे?” “तुमच्यात हुशार कोण आहे?” पण जेव्हा “चित्रपटाच्या सेटवर कोणाचे नखरे जास्त असायचे” हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सर्वाना वाटलं कि इशा नखरे जास्त करत असेल पण या प्रश्नाचं उत्तर ओंकार भोजने होत आणि त्यानेही ते मान्य केलं आणि म्हणाला कि “याच माझ्याकडे उत्तर नाही पण मला जर पटलं नाही तर मला जुळवून घेता येत नाही.” ओंकार भोजने हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आला. त्याने त्याच्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. कॉमेडी किंग म्हणून तो ओळखला जातो. पण ‘फू बाई फू’ कार्यक्रमाची ऑफर आल्यानंतर त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला रामराम ठोकला होता.

Web Title :- Onkar Bhojane | marathi actor omkar bhojane said that he will not adjust in his work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती