धुमधडाक्यात झाले ‘Gay Marriage’, मेंहदीपासून ते हळदीपर्यंतचे फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोन भारतीय व्यक्तींनी धुमधडाक्यात लग्न केले आहे. सोशल मिडियावर यांचे लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. अमित शहा आणि आदित्य मदिराजूने अमेरिकेमधील न्यू जर्सी श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये लग्न केले आहे. न्यू जर्सीमध्ये राहणारा अमित शाह आत्मा परफॉर्मिंग आर्ट्स डान्स कंपनीचा मालक आहे. आदित्य मदिराजू रिस्क मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करतो. दोघांची मुलाखत ३ वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

अमित शाहने मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘आम्ही ३ वर्षांपूर्वी मित्राच्या बर्थडे पार्टीत भेटलो होतो. त्या रात्रीनंतर आम्ही एकत्र रहायला लागलो. आमच्या दोघांची प्रर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. पण दोघांची आवड एकच आहे. आदित्य खूपच क्रिएटिव्ह आहे. एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आपल्या-आपल्या परिवारांमध्ये सांगितले.’

यांच्या लग्नासाठी फॅशन डिजायनर अनिता डोंगराने वेडिंग आउटफिट तयार केले होते. दोघांनी अनिता डोंगराने बनवलेली आउटफिट घालते होते. अनिताने त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केले होते. मेहेंदी आणि संगीत सेरेमनी आयोजन अमित आणि आदित्यच्या घरामध्ये केले गेले. लग्नामध्ये त्यांचा परिवार आणि सगळे मित्र उपस्थित होते.

अमितने सांगितले की, ‘आम्हाला प्रॉपर भारतीय पद्धतीने लग्न करायचे होते. आदित्यचा परिवार भारतामध्ये राहतो, जेव्हा ते अमेरिकेमध्ये आले तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कोणालाच फोर्स केला नाही. आमच्या परिवाराने आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांचे मी आभार मानतो.’ आदित्यने सांगितले की, ‘हे लग्न मित्र आणि परिवार समवेत झाले. आम्ही पूजा केली. एकमेकांच्या गळ्यात हार घातला आणि फेरे ही घेतले.’ अमितने सांगितले की, ‘आम्हाला या गोष्टींची जाणीव नव्हती की, एका मंदिरामध्ये होणारे सामान्य लग्न दुनियाभर लोकांच्या नजरेत येईल.’

 

आरोग्यविषयक वृत्त –