ज्येष्ठ अभिनेत्री गीता बहल यांचे कोरोनाने निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्येष्ठ अभिनेत्री गीता बहल (वय 64) यांचे कोरोनामुळे शनिवारी (दि.1) निधन झाले आहे. बहल यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना 19 एप्रिल रोजी मुंबईतील जुहूमधील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल केले होते. शनिवारी रात्री 9.40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गीता बहल यांच्यासोबतच त्यांचे भाऊ रवि बहल, 85 वर्षीय आई आणि त्यांच्या घरात घरकाम करणारी बाई आदींना कोरोनाची बाधा झाली होती. त्या तिघांनाही घरीच ओयसोलेट केले होते. गेल्या 7 दिवसांपासून तिघांचीही प्रकृती स्थिरावत होती. परंतू बहल यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने 26 एप्रिलला त्यांना आयसीयूमध्ये हलवले होते. दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटर सपोर्टवर होत्या. मात्र त्यांची कोरोना विरोधातील झुंज अपयशी ठरली आणि शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. बहल यांचे लहानपणीचे मित्र आणि अभिनेता-दिग्दर्शक आकाशदीप साबीर यांनी गीता बहल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, गीता यांच्या आई, भाऊ आणि घरकाम करणारी बाई हे तिघेही कोरोनातून बाहेर पडले. परंतू गीता बहल यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवले होते. गेल्या काही दिवसांपासून बहल यांची ऑक्सिजनची पातळी कमी-जास्त होत होती, अशा परिस्थितीत त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले होते. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनतरही बहल यांना वाचू शकले नाहीत.

या चित्रपटांतही केले होते काम
80 वे दशक गाजवणा-या अभिनेत्री गीता बहल यांनी ऋषि कपूर और मौशमी चटर्जी यांच्यासोबत दो प्रेमी, जमाने को दिखाना है, मैंने जीना सीख लिया, मेरा दोस्त मेरा दुश्मन, नया सफर आदी सारख्या हिंदी फिल्ममध्ये आपली अदाकारी दाखवली. याशिवाय गीता बहल यांनी गुजराती फिल्म नसीब नू खेल आणि यार गरीबा दा सारख्या पंजाबी चित्रपटांतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.