हेल्मेट सक्ती विरोधात सर्वसामान्यात असंतोष

उस्मानाबाद : पाेलीसनामा ऑनलाईन- जिल्ह्याभरात पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या अनावश्यक हेल्मेट सक्ती विरोधात सर्वसामान्यात असंतोष पसरला आहे अगोदरच स्थानिक प्रशासन, नगरपालिका यांच्या अनास्थेमुळे रस्त्यांची वाट लागलेली आहे त्यामुळे धड वाहन चालवता येत नाहीत. याबाबत सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे असे आहे की शासनाने रस्ते, पार्किंग सिग्नल यंत्रणा यात सुधारणा करावी बेकायदा वाहतूक बंद करावी शहरातील वाहतुकीचे नियमन करावे या सर्व गोष्टी चे तीन तेरा वाजलेले असताना  हेल्मेट सक्ती कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील राजकीय पक्षांची अनास्था तर सर्वसामान्यांच्या मुळावर उठली आहे त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी काही देणेघेणे नाही ही सर्व मंडळी येणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत दंग आहे त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. हेल्मेट सक्ती बाबत नागरिकांचे म्हणणे असे आहे की शहर हद्दीतील लागू न करता शहराबाहेर लागू करावी कारण शहरात ही अनावश्यक आहे याबाबत सर्वसामान्य प्रचंड असंतोष खदखदत असून येत्या काही दिवसात उस्मानाबादकर मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.