भन्नाट ऑफर..! लग्न केल्यानंतर मिळणार बिनव्याजी २५ लाखांचे कर्ज

मुंबई : वृत्तसंस्था – लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. काही जण आपल्या परिस्थितीनुसार लग्न करतात तर काहीजण मोठा गाजावाजा करीत लग्न करतात. काहींना लग्नासाठी कर्ज देखील काढावे लागते. मात्र, जगात असा एक देश आहे जो लग्न केल्यानंतर तुम्हाला २५ लाखांचे बिनव्याजी कर्ज देणार आहे. एवढेच नाही तर, जर तुम्ही तीन आपत्य जन्माला घातली तर हे कर्ज माफ. ही भन्नाट ऑफर आहे युरोपमधील हंगेरी या देशाची

हंगेरी देशाची वर्तमान काळातील लोकसंख्या ही ९७. ८ लाख इतकी आहे. या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच या देशात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या घटत आहे. देशाची लोकसंख्या वाढावी या उद्देशाने हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरु केली आहे. त्यानुसार, ४० पेक्षा कमी वय असलेल्या महिलांना लग्न करताना २५ लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार. तसेच जर तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास २५ लाखांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे.

एवढ्यावरच या देशाचे सरकार थांबले नाही. तर चौथे आपत्याला जन्म दिल्यास त्या कुटुंबाला आजीवन प्रप्तीकरातून सूट मिळणार आहे. तसेच या कुटुंबाला फिरण्यासाठी ७ आसनी गाडी खरेदी करण्यासाठी सहा लाखांची आर्थिक मदत देखील केली जाणार आहे. ‘स्टेट ऑफ द नेशन’ ला संबोधित करताना हंगेरीचे पंतप्रधान म्हणाले की, मुस्लिम देशातील नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यापेक्षा आपल्या देशाची लोकसंख्या वाढवणे योग्य ठरेल. ते म्हणाले की, दुसऱ्या देशातील लोकांनी आपल्या देशात यावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांना आपल्या देशात प्रतिबंध घालायला हवेत. तसेच आपली लोकसंख्या वाढवायला हवी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us