महंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’

मथूरा : वृत्तसंस्थाकोरोना Corona महामारी हे सरकारच Government षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडले जात असल्याचा अजब दावा उत्तर प्रदेशच्या Uttar Pradesh गाजियाबाद Ghaziabad येथील डासना देवी मंदिराचे Dasna Devi Temple महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी केला आहे. मी कोरोना Corona आहे असे मानणार नाही अन् मास्क देखील लावणार नाही असे अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकचं नाही तर भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचे कारण बनणार आहे. प्रत्येक हिंदूने Hindu कमीत कमी 5 ते 6 मुलांना जन्म दयायला हवा, असे वादग्रस्त विधान नरसिहांनंद यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Video : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

नरसिंहानंद सरस्वती Mahant Narasimhanand Saraswati एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मथुरा येथे आले होते.
त्यांनी संतांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोरोनावरून सरकारवर निशाणा साधला.
ते म्हणाले की, मास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे.
हे खूप मोठ षडयंत्र आहे.
मी मास्क घालत नाही कारण मला माझ्या इम्युनिटीवर Immunity विश्वास आहे.
मी कोरोनाला मानत नाही.
ज्यांची इच्छाशक्ती कमी अथवा कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत तेच लोक कोरोनामुळे मृत्यू पावत आहेत.
माझे सर्व माझ्या सोबत असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वीही नरसिंहानंदानी वादग्रस्त विधान केलं होत
काही दिवसापूर्वी डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम Muslim तरुणाला मारहाण झाली होती. त्यावळी मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी असल्याचे ते म्हणाले होते.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती