कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवालला अटक, नंतर मिळाला जामीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवाल यास कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने अटक करण्यात आली होती. शनिवारी ही घटना घडली जेव्हा गिप्पी पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील बनूरमध्ये एका चित्रपटाचे शुटिंग करत होता. गिप्पीवर आरोप आहे की, त्याने कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे, ज्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. मात्र, पोलिसांनी हे सुद्धा सांगितले की, नंतर गिप्पीला जामीनावर सोडण्यात आले.

या प्रकरणात गिप्पीशिवाय शुटिंग युनिटमधील आणखी काही सदस्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. सर्वांन बेलवर सोडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, बनूर गावात शुटिंग साईटवर जवळपास 100 लोक जमले होते, येथे विकेंड लॉकडाऊन लावला आहे. वीकेंड लॉकडाऊन तोडण्याच्या आरोपाखाली गिप्पी आणि इतरांना पोलिसांनी अटक केली होती. गिप्पीच्या विरोधात आयपीसी कलम 188 अंतर्गत बनूर पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे.

गिप्पीच्या अगोदर जिम्मी शेरगिल

काही दिवसांपूर्वी अभिनेता जिम्मी शेरगिलवर सद्धा लुधीयानामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला होता. रिपोर्टनुसार जिम्मी शेरगिल, लुधियानाच्या एका प्रायव्हेट शाळेत ’युअर ऑनर 2’ वेब सीरीजची शुटिंग करत होता.