Girish Mahajan | भाजप नेते गिरीश महाजनांचे मराठा आरक्षणाबाबत मोठं सुचक वक्तव्य; म्हणाले, “असे आऱक्षण…”

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Girish Mahajan | राज्यामध्ये सध्या मराठा समाजाचे आरक्षण (Maratha Reservation) आणि आंदोलन यावरुन राजकारण तापले आहे. जालन्यामध्ये अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. आधी त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) द्यावे अशी मागणी केली त्यानुसार राज्य सरकारकडून (State Government) जीआर देखील काढण्यात आला. पण नंतर त्यांनी सरसकट संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली असून सरकार जीआर काढत नाही तो पर्यंत उपोषणावर बसण्याचा निर्धार केला आहे. असे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर असे आऱक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही आणि पहिल्याच दिवशी फेटाळले जाईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी मत मांडले आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणावर कायमस्वरुपीचा तोडगा काढण्यासाठी वेळ पाहिजे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे असे आवाहन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावर मंत्री गिरीश महाजन यांनी सुचक वक्तव्य केले आहे. महाजनांनी सांगितले आहे की, कुणबी समाज वेगवेगळ्या भागात असून मराठवाड्यातील (Marathwada) निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करतात की, संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा, मात्र हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळला जाईल. हे अश्यक्य आहे, कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. त्यासाठी वेळ दिला पाहिजे. आज यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असून सगळे छोटे मोठे विरोधी पक्ष नेत्याच्या लोकांना बोलावलं आहे. सगळे समाज रस्त्यावर उतरले तर राज्याचे हिताचे होणार नाही. असे विधान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.

पुढे त्यांनी आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, आज मुंबईमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा निघावा हाच आमचा प्रयत्न राहणार आहे.
मनोज जरांगे यांनी पाणी सोडले आहे त्यांची तब्येत खराब होत आहे. त्यांनी उपोषण सोडावे.
दोन दिवसांपूर्वी जरांगे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते, त्यात चर्चा झाली होती.
त्यांचं म्हणणं आहे की, तात्काळ जीआर काढावा, मात्र तात्काळ जीआर काढला तरी तो टिकणार नाही.
आता या सर्व गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
या समितीच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच सरसकट आरक्षण तांत्रिक दृष्ट्या टिकणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. दुसरीकडे जरांगे उपोषण सोडणारच नाही, या भूमिकेवर ठाम आहे. मात्र उगाच त्यांच्या जीवाला धोका होईल, परमनंट सोलुशन काढण्यासाठी शासनाला त्यांनी वेळ द्यावा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”