Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”

Manoj Jarange On Prithviraj Chavan | manoj jarange answer prithviraj chavan over west maharashtra maratha reservation

पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange On Prithviraj Chavan | मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यामध्ये तापला असून यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे (Congress) आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारच्या (State Government) जीआरवरुन टीका केली होती. राज्य सरकारने मराठवाड्यातील (Marathwada) मराठा समाजाला पुरावे असल्यास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अधिकृत जीआर काढला होता. यावरुन टीका करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं असेल, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या (Western Maharashtra) मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? निजामकालीन कागदपत्रं तुम्ही ग्राह्य धरत आहात, पण शाहू महाराजांच्या काळातले दाखले ग्राह्य धरत नाही हा कुठला न्याय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर आता जालन्यामध्ये मागील 14 दिवसांपासून उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange On Prithviraj Chavan) यांनी देखील चोख उत्तर दिले आहे. उपोषणस्थळी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यावर उत्तर दिले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, ‘लका मला तर काय बोलावं कळतच नाही. मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देतो म्हणतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्याकडे निजाम होता की नव्हता मला काय माहिती. त्यांनी 8-15 दिवस निजाम पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जायचा होता. निजाम इकडे होता का, तिकडे होता का, घोडं मारलं का असं काहीही काढतात. मी असं बोललो की, परत म्हणतात असं का बोलतो. तुमच्याकडे निजाम होता आणि आमच्याकडे नव्हता. आमच्याकडे निजाम का आले नाहीत, असं ते म्हणत आहेत. आमच्याकडे इंग्रज का आले नाही, तर मग त्यांनी आमच्याकडे 8-15 दिवस इंग्रज लोटून द्यायचे होते. हे असं बोलणं चांगलं नाही” असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाची बाजू घेत पृथ्वीराज चव्हाण यांना टीव्ही घेऊन देऊ का असा खोचक सवाल देखील विचारला आहे. ते म्हणाले की, “आम्ही त्यांचं घोडं मारलं आहे का? आम्ही आरक्षण मागितलं आहे, तर मागू द्या ना. आम्हीही तुमचेच आहे ना. कुणाचं तरी एकाचं कल्याण होतच राहील, ते होऊ द्या. तरी मी जाहीरपणे म्हणतो आहे की, सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्या. हे बातम्या पाहत नाही का? त्यांच्याकडे टीव्ही नाही का? आम्ही टीव्ही घेऊन देऊ का?” असा समाचार मनोज जरांगे यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा घेतला आहे. (Manoj Jarange On Prithviraj Chavan)

पुढे जरांगे म्हणाले की, “मी संपूर्ण महाराष्ट्राविषयी बोलतो आहे, मग पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का?
सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षणाची मागणी करतो आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रात असणारच ना.
मी जीव जाळतोय, मी सगळ्यांना आरक्षण देणार आहे. मी एकही विभाग सोडणार नाही. मी कोरडा पडायला लागलोय बाबा.
त्यांनी तिकडं ताकद लावावी, माझ्याकडे लावू नये.” अशा शब्दांमध्ये मराठा उपोक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी
पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यावर प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील
पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावले असून तुम्ही देखील एके काळी राज्याचे मुख्यमंत्री होता.
टीका करणं फार सोपं असतं, असे अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात आज (दि.11) सर्वपक्षीय बैठक
बोलावण्यात आली असून यामध्ये आरक्षणावर काय तोडगा निघणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Mumbai Politics | मुंबईतील विद्यमान खासदारांचे पत्ते कट होणार? भाजपकडून मोठ्या फेरबदलाची शक्यता

Total
0
Shares
Related Posts
Sonia Gandhi Birthday | Inauguration of Service, Duty and Sacrifice Week by Prithviraj Chavan on the occasion of Sonia Gandhi's birthday; Former Chief Minister said - 'Sonia Gandhi a visionary leader'

Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन; माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘सोनिया गांधी दूरदृष्टीच्या नेत्या’