Girish Murudkar | ‘सिपोरेक्स ब्लॉक्स’ माध्यमातील कलाकृती रसिकांच्या भेटीस !

पुणे : शिल्पकलेपेक्षा तुलनेने नवे असलेले सिपोरेक्स ब्लॉक्सचे (Siporex Blocks) माध्यम कलाकार गिरीश मुरूडकर (Girish Murudkar) यांनी कल्पकतेने वापरले असून त्यांच्या कलाकृतींचा समावेश ‘सावली’ या सामूहिक कला प्रदर्शनात करण्यात आला आहे. आर्ट फाऊंडेशन (Art Foundation) आयोजित हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन (Balgandharva Kaladalan) येथे १ ते ३ जून २०२३ पर्यंत रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे.तेथे या कलाकृती कलाकारांच्या सामूहिक प्रदर्शनात ठेवण्यात येत आहेत. (Girish Murudkar)

सिपोरेक्सच्या सिमेन्टब्लॉक्स कोरून पगडया ,छोटा जिरेटोप,वृन्दावन,गणपती,अनेक आर्ट पीस मुरुडकर यांनी केले असून ते या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटासाठी तयार केलेल्या पेशवे पगडीची प्रतिकृती देखील मांडण्यात येणार आहे.हेक्सा ब्लेड ,करवत,पॉलिश पेपर,खिळा ,साल काढण्याची सुरी(सोलाणे ),कापण्याची सुरी अशा सोप्या घरगुती अवजाराच्या वापरातून या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. ही अवजारेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.ज्यांना या माध्यमाचे प्रशिक्षण प्रदर्शन कालावधी संपल्यानंतर घ्यायचे आहे,त्यांची नावनोंदणी केली जाणार आहे. (Girish Murudkar)

मुरुडकर यांच्यासह सुमारे ३० कलाकारांची कलाकृती,चित्रेही या प्रदर्शनात असतील.

Web Title : Girish Murudkar ‘Ciporex Blocks’ for art lovers!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)