पिंपरीत तरुणीने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

ADV

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन –पिंपरी, खराळवाडी येथे इमारतीवरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

वर्षा शंकर जगताप (19, रा. एच. ए. कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

ADV

हिमस्खलनात १ जवानाचा मृत्यू, ५ जण बेपत्ता 

मिळालेल्या माहितीनुसार, खराळवाडी मधील खराळआई उद्यानाजवळ वैष्णवी पार्क ए. जे. चेंबर्स ही तीन मजली इमारत आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या डक्टमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने आसपासच्या नागरिकांनी डक्टकडे धाव घेतली असता मयत तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसले.

नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी चिठ्ठी आढळून आली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.