Nagpur News : ‘सेक्स’ करताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव, ‘त्या’ आरोपी गर्लफ्रेंडला जामीन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  पॉर्न चित्रपट पाहून संभोगाचा विचित्र प्रकार अनुभवताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचून हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणीची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. 7 जानेवारी रोजी खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथे ही घटना उघडकीस आली होती.

बाबतची सविस्तर माहिती अशी की, टेकानाका परिसरात राहणा-या तरुण- तरुणीचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तरुणाच्या कुटुंबाचा या संबंधांना विरोध असल्याने तरुणाने दुसऱ्या मुलीशी लग्न केले होते. तिच्यापासून त्याला एक महिन्याचा मुलगाही आहे. मात्र, त्याचे तरुणीशी प्रेमसंबंध कायम होते. या दोघांनी 2019 मध्ये नोंदणी विवाह केल्याचा दावाही तरुणीने केला आहे. तिच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांनी दहेगाव रंगारी येथे लॉजवर खोली भाड्याने घेतली. मोबाइलवर पॉर्न चित्रपट पाहून त्यातील दृश्याप्रमाणे संभोग करण्याच्या प्रयत्नात या तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, तरुणाच्या वडिलांनी प्रेयसीनेच माझ्या मुलाचा गळा आवळून खून केला अशी तक्रार केली होती. खापरखेडा पोलिसांनी चौकशीअंती खुनाचा गुन्हा दाखल करीत तरुणीला अटक केली. तिने अ‍ॅड. अपूर्वा धवनकर आणि अ‍ॅड. एस. टी. चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी तिची जामिनावर सुटका केली आहे.