Girlfriend On Rent | इथं भाड्याने मिळतात ‘गर्लफ्रेन्ड’, तुम्ही सुद्धा करू शकता ‘हायर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Girlfriend On Rent | तुम्हाला गर्लफ्रेंड नाही म्हणून तुमचे आई-वडील तुम्हाला रागावू शकतात, असा तुम्ही कधी विचार केला आहे का. होय, असे चीनमध्ये होते. यापासून वाचण्यासाठी येथील तरूण भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन तिची भेट आई-वडीलांशी करून देतात. चीनमध्ये यासाठी अनेक अ‍ॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने गर्लफ्रेंड हायर (Girlfriend On Rent) केली जाऊ शकते.

गर्लफ्रेंड नसेल तर कुटुंबिय रागावतात

बहुतांश चीनी तरुण जेव्हा सुटीसाठी आपल्या घरी जातात तेव्हा रेंटवर गर्लफ्रेंड हायर करतात.
अन्यथा त्यांना त्यांचे आई-वडील आणि नातेवाईकांच्या कठिण प्रश्नांचा सामना करावा लागतो.
अनेकदा तरूणांना लग्न आणि गर्लफ्रेंडचे महत्व यावर नातेवाईकांचे लेक्चर ऐकावे लागते.

रेंटवर गर्लफ्रेंडच्या असतात या अटी

रेंटवर गर्लफ्रेंड (Girlfriend On Rent) ठेवण्यासाठी अटी असतात की, गर्लफ्रेंड हायर करणारा व्यक्ती मुलीला स्पर्श करू शकत नाही.
मुलगी त्या व्यक्तीला इमोशनल सपोर्ट देईल, त्याच्या गर्लफ्रेंडप्रमाणे वर्तन करेल.

गर्लफ्रेंड हायर करण्यासाठी इतका खर्च

माहितीनुसार, रेंटवर गर्लफ्रेंड हायर करण्यासाठी मुलांना 1,999 युआन म्हणजे सुमारे 22,816 रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात.
यानंतर ते भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंडची घरच्यांशी भेट घडवून आणू शकतात. तिच्यासोबत डेटवर जाऊ शकतात. तिच्यासोबत चॅट करू शकतात.

 

यावेळी वाढतो GF चा रेट

चीनमध्ये लूनर न्यू ईयरच्या वेळी रेंटवर गर्लफ्रेंड हायर करणे आणखी महागडे ठरते.
तेव्हा तरूणांना भाड्याच्या गर्लफ्रेंडसाठी 3 हजार युआन म्हणजे 34,241 रुपयांपासून 10 हजार युआन म्हणजे 1,14,139 रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात.
कारण न्यू ईयरला बहुतांश लोक सुटीसाठी घरी परत येतात.

किती कठिण असते गर्लफ्रेंड होणे

रेंटवर गर्लफ्रेंडचे काम करणार्‍या एका मुलीने सांगितले की, तिचे काम खुपच कठिण आहे कारण प्रत्येक वेळी एका अनोळखी व्यक्तीची गर्लफ्रेंड व्हावे लागते.

 

Web Title : Girlfriend On Rent | chinese boys hire fake girlfriend on rent using apps growing marriage problem

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | नगरपरीषदेच्या इमारतीवरील अक्षरांचा रंग गेल्याचे पाहून अजित पवार संतापले; अवघ्या 2 तासात ‘चेंज’

Auto Debit Cheque Book Pension Rules | 5 दिवसानंतर बदलतील ‘हे’ 6 नियम, पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमामुळे सॅलरीसह इतर गोष्टींवर होणार परिणाम

Maharashtra Rains | मुंबईसह राज्यात रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता