मुलींनो ऑनलाइन शॉपिंगद्वारे वन पीस मागवता आहात, होऊ शकते अटक !!

वृत्तसंस्था : इंग्लडमधील एका महिलेने एक ड्रेस ऑनलाइन मागवला होता. पण तो ड्रेस परिधान करून ती जर बाहेर गेली असती तर तिला अटक झाली असती असे तिचे म्हणणे आहे. 23 वर्षांची हॉली स्मिथ लीगल अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करते. हॉलीने एका वेबसाइटवरून तिच्यासाठी एक ड्रेस मागवला होता. पण ड्रेस पाहून तिला आनंदाऐवजी फक्त मनस्तापच झाला.

हॉलीने सांगितले की, तिने या साइटवरून एक काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस खरेदी केला होता. साइटवर हा ड्रेस तिच्याच साइजचा असल्याचे सांगण्यात आले होते. ठरलेल्या वेळेत हा ड्रेस घरी डिलिव्हर झालादेखिल त्यानंतर हॉलिने पार्टीसाठी हा ड्रेस उघडला.

हॉलीने हा ड्रेस परिधान केला तर त्याची साइज पाहून तिला धक्काच बसला. तो एवढा लहान होता की, तिचे पाय मांड्यांपर्यंतही झाकले जात नव्हते. वेबसाइटवर मात्र तो ड्रेस गुडघ्याच्या खालपर्यंत असल्याचे दाखवलेले होते. त्यामुळे हॉलीला प्रचंड मनस्ताप झाला होता.
हॉलीने तो ड्रेस परिधान करून फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट करून कंपनीला खरे खोटे सुनावले. महिलेने ट्विटरवर पोस्ट करत कंपनीला लिहिले, तुम्ही लोक ड्रेस तयार करताना बट्सची काळजी घेत नाहीत का ? यानंतर कंपनीकडून रिप्लाय करण्यात आला की या काहीही खराबी नाही. त्यावर हॉलीने वेबसाइटवरील आणि तिने प्रत्यक्षात परिधान केलेल्या ड्रेसचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, या ड्रेसमध्ये माझे बॉडी पार्ट्स दिसत आहेत. जर मी लक्ष दिले नसते तर पब्लिकमध्ये जाताच मला पोलिसांनी अटक केली असती.