पाच टॉप नक्षलवाद्यांची माहिती द्या आणि लखपती व्हा…

नागपूर : वृत्तसंस्था
नक्षलवाद्यांविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या मोहीमेत वाढ केली आहे. पोलिसांनी पाच टॉप नलक्षलवाद्यांची माहीती देणा-यास लाखोंची बक्षीसे जाहीर केली आहेत. तशा आशयाची जाहिरात पोलिसांनी वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. अशा प्रकारची जाहीरात देण्याची पोलिसांच्या इतिहासातील पहीलीच वेळ आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची माहीती देऊन लखपती बननण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

पाच टॉप नक्षल्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण एक कोटी 71 लाख रुपयांचं बक्षीसे जाहीर केली आहेत. यामध्ये मनोजा वेणूगोपाल उर्फ भूपती, दीपक मुलिंग उर्फ सह्याद्री तेलतुंबडे, नर्मदाअक्का, जोगण्णा उर्फ घिसू आणि पहाडसिंग उर्फ टिपू सुलतान यांचा समावेश आहे.

बक्षीसे जाहीर करण्यात आलेले नक्षलवादी हे नक्षलवाद्यांचा कणा म्हणून ओळखले जातात. बुद्धी, पैसा, नियोजन आणि शस्त्र याची जबाबदारी या टॉप पाच जणांवर आहे. गडचिरोलीच्या नक्षलवादी चळवळीचे हे मुख्य पाच खांब आहेत. या पाच जणांना अटक केली तर नक्षलवादी चळवळ मोडीत काढता येईल असा विश्वास पोलीसांना आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाखोंची बक्षीसे जाहीर केली आहेत. परंतु या पाच जणांच्या दहशतीमुळे कोणी पुढाकार घेते का हे पहावे लागणार आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईला उत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांनी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गडचिरोलीतील भामरागड – पेरमिली मार्गावर असलेल्या आलदण्डी गावाजवळ नक्षलवाद्यांनी धमकीचे बॅनर लावले आहेत.