Global Adgaon Movie | माजलगावच्या अनिलकुमार साळवे यांनी न्यू जर्सी येथील फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला ‘हा’ पुरस्कार

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बीडमधील माजलगावच्या अनिल कुमार साळवे यांनी दिग्दर्शित केलेला ‘ग्लोबल आडगाव’ (Global Adgaon Movie) या चित्रपटाने अमेरिकेतील न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावला आहे. अनिल कुमार साळवी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटात 672 कलाकारांचा समावेश आहे. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बेस्ट स्टोरी रायटर हा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला आहे. आत्तापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. (Global Adgaon Movie)

 

ADV

आजवर या चित्रपटाला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. अनिल कुमार साळवे यांनी या चित्रपटाआधी देखील 4 लघुपट दिग्दर्शित केले आहेत. तर 39 एकांकिका 6 नाटक 12 पथनाट्य त्यांनी लिहिले आहेत. ग्लोबल आडगाव या चित्रपटाची कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील निवड करण्यात आली होती. या चित्रपटाला बेस्ट फिल्म आणि बेस्ट डायरेक्टरसाठी नामांकन प्राप्त झाले होते. या चित्रपटातून शेती, माती, ग्राम संस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेले शेतकरी या ग्लोबलायझेशनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. तर लवकरच हा सिनेमा रुपेरी पडल्यावर देखील प्रदर्शित होणार आहे. (Global Adgaon Movie)

या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, आशिर्वाद नवघरे, प्रियंका सदावर्ते, जगदीश गोलहार,ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,
मंगेश तुसे, वैदेही कदम या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटातील गाणी आदर्श शिंदे,
डॉक्टर गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गायले आहेत.
याआधी देखील ग्लोबल आडगाव या चित्रपटातील अशोक कानगुडे या अभिनेत्याला अजंठा वेरूळ
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

 

Web Title :- Global Adgaon Movie | global adgaon movie anilkumar salve win award in new jersey film festival

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या आमदाराचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘शपथविधीबाबत संजय राऊतांना…’

Chetan Sharma Resigns | BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांचा राजीनामा

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना