तुझ्या बापाला सांग मला गोव्याचे मुख्यमंत्री भेटले होते

पणजी : गोवा वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे काल रविवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. पर्रीकर हे लोकाभिमुख आणि तळमळीचे नेते होते. त्याच बरोबर त्यांची साधी राहणी देखील लोकांच्या चर्चेचा विषय असायची. मनोहर पर्रीकर यांच्या आयुष्यातील एक किस्सा खूप गाजला तो म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या मुला संदर्भात होता.

सकाळी ६ वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्कुटरवरून आपल्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यादिवशी पर्रीकरांना ऑफिसमध्ये जाण्यास उशीर झाला होता. तरी देखील गाडी एका चौकात सिंगनलला थांबवली. सकाळची वेळ असल्याने पणजीच्या रस्त्यावर कसलीच गर्दी नव्हती. तरी देखील पर्रीकर यांनी सिंगनल पाळण्याच्या मनसुब्याने गाडी सिंगनलला उभा केली. तेव्हा त्यांच्या मागून एक आलिशान गाडीवाला येऊन तेथे उभा राहिला. त्याने रागाच्या भरात पर्रीकरांना विचारले तू गाडी का थांबवली. त्यावर पर्रीकर म्हणाले तुला सिंगनल लाल असल्याचे दिसत नाही का. पर्रीकर असे म्हणताच गाडीतील व्यक्तीचा पारा चढला आणि तो रागाच्या भरात बोलू लागला, तुला माहित आहे का माझा बाप या भागाचा पोलीस निरीक्षक आहे. असे म्हणताच पर्रीकरांनी त्या तरुण व्यक्तीस म्हणले तुझ्या वडिलांना सांग मला गोव्याचे मुख्यमंत्री भेटले होते. पर्रीकर असे म्हणताच तो कर चालक तरुण पर्रीकरांच्या पाया पडू लागला. त्यावर पर्रीकर फक्त इतकच म्हणाले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करत जा. नेहमी सिंगनल पळत जा. एवढे म्हणून पर्रीकर आपल्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे निघून गेले.

अशा सध्या राहणीचे मनोहर पर्रीकर ज्यावेळी गोव्याच्या राजकारणात आमदार म्हणून निवडून गेले. तेव्हा भाजपचे गोव्यात फक्त चार आमदार होते. त्यानंतर त्यांनी सहाच वर्षात राज्यात भाजपचे सरकार स्थापन केले आणि पर्रीकर मुख्यमंत्री झाले. पर्रीकर पणजीमध्ये ज्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्या फ्लॅटचे कर्ज अद्याप ते भरत होते. एवढी स्वच्छ प्रतिमा त्यांनी राजकीय जीवनात सांभाळली होती.