बकरी ईद : 8 लाखाला विकला जातोय ‘सलमान’, शरिरावर लिहीलंय ‘अल्लाह’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज म्हणजेच १२ ऑगस्टला सोमवारी देश भरात बकरी ईद साजरी केली जात आहे. यामुळे जनावरांच्या बाजारात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरमध्ये बकरी ईद आधी सलमान नावाच्या एका बकऱ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. या विक्रीसाठी असलेल्या बकऱ्याची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल ८ लाख रुपये आहे.

बकरी ईद निमित्त विक्रीला असलेल्या या बकऱ्याची किंमत एखाद्या लक्झरी कारच्या किंमती एवढी आहे. बकऱ्याचा मालक मोहम्मद निजामुद्दीन यांनी यासंबंधित माहिती देताना सांगितले आहे की, या बकऱ्याची किंमत ८ लाख रुपये आहे. कारण या बकऱ्याच्या शरीरावर अल्लाह असे लिहिले आहे.

रोजचा बकऱ्याचा खर्च ८०० रुपये
बकऱ्याच्या मालकाकडून सांगण्यात आले की या बकऱ्याची अत्यंत काळजी घेण्यात येते, त्यांच्यावर रोजचा खर्च जवळपास ८०० रुपये आहे. एवढेच नाही तर स्व:तावर होणाऱ्या खर्चापेक्षा बकऱ्यावर होणार खर्च आधिक आहे. बकऱ्याचे वजन ९५ किलो आहे. असे सांगण्यात येत आहे की हा बकरा गोरखपूरमधील सर्वात महागडा बकरा आहे.

ईद – उल – अजहा बकरी ईदचा सण मुख्यत: कुर्बानीच्या पर्वात साजरा करण्यात येतो. सांगण्यात येते की ईद उल अजहा च्या दिवशी हजरत इब्राहिम अल्लाह च्या आदेशानुसार अल्लाहच्या प्रति श्रद्धा दाखवण्यासाठी आपल्या मुलाची कर्बानी देण्यास तयार झाले होते.

पंरपरागत साजरा करण्यात येणाारा हा सण हज यात्रा सुरु होण्याच्या दोन दिवसानंतर साजरा करण्यात येतो. इस्लाम धर्मात गोड ईदनंतर बकरी ईद सर्वात महत्वाचा सण समजला जातो.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like