Godavari Trailer Release | निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपटचा ट्रेलर रिलीज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Godavari Trailer Release | उत्तम अभिनेता उत्तम कवी त्याचबरोबर चांगला सूत्रसंचालक म्हणून चित्रपटसृष्टीत आदराने ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे जितेंद्र जोशी (Jitendra Joshi). जितेंद्र जोशींना आज आपण अनेक नाटक, सिरीयल, वेब सिरीज आणि सिनेमांच्या माध्यमातून पाहिलेच आहे. मात्र पहिल्यांदाच एक नवे पाऊल टाकत त्यांनी निर्मिती केलेला पहिलाच चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. निखिल महाजन (Nikhil Mahajn) दिग्दर्शित गोदावरी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Godavari Trailer Release) होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

एका समारंभा दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांच्या शुभहस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यानंतर जितेंद्र जोशी यांनी स्वतः इन्स्टा च्या अकाउंट वरून हा ट्रेलर पोस्ट केला आहे. पोस्ट करताना त्यांनी अतिशय भावूक असे कॅप्शन दिले आहे. “अबोल नात्यांच्या, अव्यक्त भावनांच्या व्यक्त होण्याचा प्रवास, खळाळत्या नदीसोबत..! तुमच्या-आमच्या कुटुंबाची गोष्ट; सादर आहे ‘गोदावरी’चा ट्रेलर (Godavari Trailer Release), खास तुमच्यासाठी! भेटूया 11.11.2022 रोजी नदीसाठी, नदीकाठी! ‘गोदावरी’ फक्त चित्रपटगृहांत”.

ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की, एक साध्या हस्त्या खेळत्या कुटुंबाची चढ-उतार, परंपरा, रुढी, भावना त्याचे सुंदर मिश्रण या चित्रपटात दाखवले आहे. तर या चित्रपटाची मुख्य दुवा म्हणजे गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी आणि निशिकांतचे एक अनोखे नाते हे चित्रपटाचे कोड चित्रपट पाहिल्यानंतरच उलघडेल हे मात्र नक्की. सध्या या कोड्यामुळेच प्रेक्षकांना गोदावरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे या मुख्य भूमिकेत आहेत. तर हा चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title :- Godavari Trailer Release | jitendra joshi new marathi movie godavari trailer launched

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच योगेशने साधला किरण मानेंवर निशाणा; म्हणाला कि….

KRK ने यावेळी चक्क सलमान खानची मागितली माफी, काय आहे नेमके प्रकरण?

Rishab Shetty | ‘कांतारा’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अभिनेता ऋषभ शेट्टीने केलं ‘हे’ मोठे वक्तव्य