KRK ने यावेळी चक्क सलमान खानची मागितली माफी, काय आहे नेमके प्रकरण?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : KRK | नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारा चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खान (Actor Kamal R Khan (KRK) पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी त्यांनी चक्क बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांची ट्विटरवर माफी मागत ट्विट केले आहे.

 

नेहमीच बॉलीवूडच्या कलाकारांना निशाणा करणारा केआरके (KRK) ने मात्र यंदा ट्विटवर सलमान खानची (salman-khan) खरडपट्टी न काढता चक्क त्याची माफी मागितली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की माझ्या अटके मागे सलमान खानचा हात नव्हता. त्यांच्याविषयी मला गैरसमज झाल्याबद्दल तुम्ही मला माफ करावे असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर नमूद केले आहे.

 

या ट्विटला लागून अजून एक ट्विट जोडत त्याने करण जोहरची (Karan Johar) देखील माफी मागितली आहे.
युवा सेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी 2020 मध्ये काही ट्विट मुळे केआरके त्याच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल केले होते.
याच संदर्भात 30 ऑगस्ट 2022 रोजी कमाल आर खान ला अटक करून बोरवली न्यायालयात हजर करण्यात आले.
यामध्ये त्यांना 14 दिवसीय न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले आहे.
या आधी देखील केआरकेने सलमान खानवर अनेक वैयक्तिक आरोप केले होते.
या संदर्भात सलमान खानच्या टीमने केआरके वर मानहानीचा दावा देखील दाखल केला होता.

 

Web Title :- KRK | krk apologized to salman khan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

South Film Actress | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला दुर्मिळ आजार; मेगास्टार चिरंजीवी यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’