Gokhale Institute In Pune | पुण्यातील गोखले संस्थेतील घटना, मतदार जागृती फलकावर लिहिले ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत (Gokhale Institute In Pune) मतदान जागृती फलकावर अज्ञात व्यक्तीने ‘इन्कलाब जिंदाबाद’ (Inqlab Zindabad), ‘नोटा’ (Nota), असे लिहिल्याचा प्रकार आज उघडकीस आला. यानंतर सर्वांची एकच धावपळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भरारी पथकाने संस्थेत जाऊन पाहणी केली.(Gokhale Institute In Pune)

दरम्यान, हे कृत्य कोणी केले हे अद्याप समजलेले नाही. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण गोखले संस्थेच्या प्रशासनाने दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोखले संस्थेतील अकादमिक ब्लाक या इमारतीमध्ये इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लबने वॉल ऑफ डेमोक्रेसी तयार केली आहे. यामध्ये स्वाक्षरी फलक लावला आहे. मतदार जागृती करण्यासाठी हा एक उपक्रम आहे.

या फलकावर गोखले संस्थेसह निवडणूक आयोग, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थांची बोधचिन्हे आहेत.
परंतु, आज सकाळी या फलकावर नोटा, इन्कलाब जिंदाबाद लिहिले असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी याबाबत इशारा देताना म्हटले की,
फलकाची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Murder | पिंपरी : नशेत तरुणीसोबत लैंगिक अत्याचार, मानलेल्या भावाने तरुणाचा डोक्यात विट घालून केला खून

Sanjay Raut To Vishwajeet Kadam | ”सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्यात, तिथे ठाकरे गटाचा उमेदवार आवश्यक”, राऊतांनी विश्वजीत कदमांना समजावले