Pimpri Chinchwad Murder | पिंपरी : नशेत तरुणीसोबत लैंगिक अत्याचार, मानलेल्या भावाने तरुणाचा डोक्यात विट घालून केला खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मानलेली बहिण नशेत असताना तिच्यासोबत लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले. याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून तरुणाचा खून (Pimpri Chinchwad Murder) केला. ही घटना शुक्रवारी (दि.5) भूमकर वस्ती, वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडली आहे. याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बुधवारी (दि.10) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri Chinchwad Murder)

निकेतकुणाल विजयकुमार सिंह (वय 28, रा. भुजबळवस्ती, वाकड) असे खून झालेल्याचे नाव आहे. लोकेंद्र किशोरसिंह (वय 28, रा. दत्त मंदिर रोड, वाकड, मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल (PSI Dnyaneshwar Jhol) यांनी बुधवारी (दि. 10) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मानलेली बहिण आणि मयत निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत कामाला आहेत. 3 एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांसोबत एकत्र पार्टी केली. आरोपीच्या बहिणीला नशा जास्त झाल्याने ती निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर थांबली. त्यावेळी निकेतकुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तिने मानलेला भाऊ आरोपी लोकेंद्र याला सांगितले.

यासंदर्भात जाब विचारण्यासाठी लोकेंद्र हा शर्टमध्ये वीट घेऊन निकेतकुणाल याला मारण्यासाठी फ्लॅटवर गेला. त्याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लोकेंद्र याने सोबत आणलेली वीट निकेतकुणाल याच्या डोक्यात घातली. यामध्ये जखमी झालेल्या निकेतकुणाल याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडून दिले. त्याच रात्री निकेतकुणाल याचा झोपेत मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

निकेतकुणालचा आत्महत्येचा प्रयत्न

घटनेबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल होईल आणि बदनामी होईल या भितीने निकेतकुणाल याने रुग्णालयातून घरी आल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या गळ्याभोवती तसे व्रण देखील दिसत होते. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात निकेतकुणाल याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कारण
समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन लोकेंद्र किशोरसिंह याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरूरमध्ये भाजपला ‘दे धक्का’, अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार!

Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | आमची लढाई ही दडपशाही विरोधात, सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र