Gold Rate Today : ‘विक्रमी’ उच्चांकीजवळ जाऊन सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या राज्यातील प्रमुख ठिकाणचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याच्या बाजार खुला झाला तेव्हा सुरुवातीच्या सत्रात नव्या विक्रमी उंचीच्या जवळपास पोहचलेले सोने स्वस्त झाले. MCX मध्ये ऑगस्टच्या सोन्याच्या डिलिव्हरीमध्ये 50 रुपयांची घट दिसून आली त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 48 हजार 250 रुपये झाला. आजच्या दिवसभरात सोन्याच्या दराने 48 हजार 462 एवढी उंची गाठली होती.

सोन्यानंतर चांदीच्या दरातही घट दिसून आली. जुलैमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीचा MCX मध्ये भावात कोणताही बदल झाला नाही. प्रति किलो चांदाची दर 49 हजार 589 रुपये होता. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. अशा संकट प्रसंगी गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. भारतीय बाजारात सोन्याने या आठवड्यात विक्रमी 48 हजार 589 रुपये प्रति 10 ग्रॅमची उंची गाठली होती. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याच्या दरात 0.8 टक्के आणि चांदीच्या दरात 0.6 टक्के वाढ झाली होती.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दराने मागील आठ वर्षाच्या उच्चांकाजवळ मजल मारली होती. कोरोना व्हायरसमुळे अनेक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तसेच सोने, बॉन्ड्स आणि अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत 0.1 टक्क्यांच्या वाढीसह 1772.61 डॉलर प्रति औस झाली आहे.

मुंबईत सोने स्वस्त, चांदी वधारली
आज सोन्याच्या दरात घट झाली मात्र आजची घट ही किरकोळ आहे. आज सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 60 रुपयांनी स्वस्त झाले. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 48 हजार 300 वर सुरु आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 47 हजार 300 वर सुरु आहे. सोन्याच्या दरासोबत चांदीतही 10 रुपयांची वाढ दिसून आली.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)
पुणे – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)
जळगाव – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)
कोल्हापूर – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)
लातूर – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)
सांगली – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)
बारामती – 48 हजार 300 (कालचा दर 48 हजार 360)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)
पुणे – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)
जळगाव – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)
कोल्हापूर – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)
लातूर – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)
सांगली – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)
बारामती – 47 हजार 300 (कालचा दर 47 हजार 360)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील चांदीचे दर
मुंबई – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)
पुणे – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)
जळगाव – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)
कोल्हापूर – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)
लातूर – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)
सांगली – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)
बारामती – 48 हजार 500 (कालचा दर 48 हजार 110)