निजाम म्युझियममधून मौल्यवान वस्तूंची चोरी

हैदराबाद : वृत्तसंस्ठा

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील पुरानी हवेलीमधील निजाम म्युझियममधून हिरेजडित सोन्याचा डब्बा आणि सोन्याचा चहाचा कप चोरीला गेला आहे . डब्बा आणि कप अतिशय मौल्यवान होता. रुबी आणि हिरेजडित या तीन थरांच्या या डब्ब्याचं वजन दोन किलो आहे. या प्राचीन वस्तूंची किंमत सुमारे ५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे . हैदराबादचा सातवा आणि शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान, असफ जाह यांनी या वस्तूंचा वापर केला होता.म्युझियमच्या अधिकाऱ्यांनी या वस्तूंची चोरी झाल्याची माहिती दिली.
म्युझियम उघडल्यानंतर या दोन वस्तू गायब असल्याचं कर्मचाऱ्यांना दिसलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
[amazon_link asins=’B07FDXCWRH,B079NBHCKM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’caba4727-b014-11e8-a6e2-2be9fb96cda1′]
हे चोर व्हेंटिलेटरच्या मार्गावरुन म्यूझियममध्ये घुसले होते.सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा ब्लर असल्याचं पोलिसांनी समजलं. या चोरीमागे म्युझियममध्ये काम करणारा कर्मचारी किंवा माजी कर्मचाऱ्याचा हात असू शकतं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चोरांना पकडण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी दहा पथकांची स्थापना केली आहे.

‘या’ कारणास्तव रिझर्व्ह बँकेकडून ८.४६ टन सोने खरेदी

या म्‍युझियममध्ये निजाम मीर महबूब अली खान , निजाम मीर उस्मान अली खान यांच्या ४५० वस्तू प्रदर्शनाला मांडल्या आहेत . या वस्तूंची आंतरराष्‍ट्रीय बाजारातील किंमत ५०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

हवाई दलाचे मिग विमान कोसळले