Gold investment | खुशखबर ! उद्यापासून स्वस्त होतंय सोनं, ताबडतोब करा खरेदी; जाणून घ्या कुठून खरेदी करायचे आणि काय असेल किंमत?

नवी दिल्ली : Gold investment | सोने खरेदी (Gold) करायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. उद्यापासून तुम्ही स्वस्त सोने खरेदी (Gold Price) करू शकता. जर सोन्यात गुंतवणूक (Gold investment) करण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. तुम्हाला सोमवारीपासून शानदार संधी मिळणार आहे. ही संधी केंद्र सरकार देत आहे.

12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 च्या चौथ्या सीरीज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) ची विक्री होत आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत चालेल. रिझर्व्ह बँक (RBI) नुसार, या सीरीजमध्ये प्रति ग्रॅम गोल्डची किंमत 4,807 रुपयांपर्यंत ठरवलेली आहे. Sovereign Gold Bond आरबीआय सरकारकडून जारी करते. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

प्रति ग्रॅम 50 रूपयांची सूट मिळेल
सॉवरेन गोल्ड बाँड 2021-22 चा चौथा हप्ता सोमवारपासून पाच दिवसासाठी सबस्क्रीपशनसाठी
खुला राहील. बाँडसाठी ऑनलाइन अर्ज केला तर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजे एक ग्रॅम
गोल्ड बाँडची किंमत 4,757 रुपये असेल.

जाणून घ्या कुठे खरेदी करू शकता
हे बाँड सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि
मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज (Stock Exchanges), NSE आणि BSE च्या माध्यमातून विकले जातील. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये याची विक्री होत नाही.

जाणून घ्या किती करू शकता गुंतवणूक
एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती कमाल 4 किग्रॅ सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे.

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 287 नवीन रुग्ण, 228 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 214 नवीन रुग्ण, 250 जणांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold investment | good news you can buy gold at cheapest price from 12 to 16 july check rates and other details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update