सोनं 45 हजाराच्या टप्प्यात, आणखी स्वस्त होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसापासून सोन्याचांदीच्या दरात वारंवार चढउतार होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा परिणाम सोन्यामध्ये तेजी दिसून आली आहे. तर दुसऱ्या लॉकडाउनच्या संकटाने सराफा व्यापारामध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. सोन्याची मागणी कमी झाली असल्याने दर आणखी कमी होण्याची चिन्हे दिसत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

तसेच, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) शुक्रवारी सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ४५००८ रुपये या किमतीवर बंद झाला आहे. गेले सात दिवसात सोने दरात सरासरी २५० रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव शुक्रवारी ६७४५३ रुपयांवर थांबला. त्यामध्ये २५८ रुपयांनी घसरण झाली. ऑगस्ट २०२० मध्ये कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर ५६२०० रुपयांच्या उच्चांकी स्तरावर गेला होता. तसेच मार्च महिन्याच्या प्रारंभी सोन्याचा दरात मोठी घसरण झाली होती. सोन्याचा दर ४४१५० रुपये इतका कमी झाला होता. बाजारात सोन्याच्या मागणीला प्रोत्साहन मिळावे यासाठी डिलर्सना सोन्यावर प्रती औंस ६ डॉलर्सचा प्रिमियम आकारला होता. तर भारतात सोने खरेदी करताना ग्राहकांना १०.७५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटी द्यावा लागतो.

तर फेडरल रिझर्व्हची पतधोरणाच्या भूमिका आणि अमेरिकेतील आर्थिक स्थिती बघता जवळच्या काळात डॉलरचे दर कमी होण्याची शक्यता नाही, असा अंदाज क्रेडीट सुस या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये वाढ होण्याची शक्यता असून सोन्यावर परिणाम होईल. आगामी ३ ते १२ महिन्यांच्या काळात सोन्याचा दर प्रती औस १७०० डॉलर्सपर्यंत खाली येईल, असे भाकीत क्रेडीट सूसने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. सध्या सोन्याचा भाव १७३५ डाॅलर्स आहे.

शनिवारचे सोन्याचे दर –

मुंबई :
२२ कॅरेट – ४३९३० रुपये
२४ कॅरेट – ४४९३० रुपये

दिल्ली :
२२ कॅरेट – ४४४०० रुपये
२४ कॅरेट – ४८४४० रुपये

चेन्नई :
२२ कॅरेट – ४२५०० रुपये
२४ कॅरेट – ४६३६० रुपये

कोलकत्ता :
२२ कॅरेट – ४४५६० रुपये
२४ कॅरेट – ४७२३० रुपये