खुशखबर ! सोने खरेदीची ‘सुवर्ण’संधी, दरामधील घसरण थांबता थांबेना, जाणून घ्या आजचे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पंधरावड्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये बराच चढउतार पहायला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीवर देखील झाला आहे. आज गुरुवारी सोन्याच्या दरात 684 रुपयांची घसरण झाली असून सोने 51 हजार 938 रुपये प्रति तोळा झाले आहे.

सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात 1600 रुपयांची उलथापालथ दिसून आली. इंट्रा डेममध्ये सोने 51865 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरले. तर 52550 रुपयांचा स्तर गाठला होता. चांदीच्या दरात देखील 983 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या चांदीचा एका किलोचा भाव 66980 रुपये प्रिती किलो आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 116.96 डॉलरने कमी झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 5.67 टक्क्यांनी घसरून 1944.45 डॉलरवर बंद झाले होते. तर डिसेंबरचा सोन्याचा दर 5.68 टक्क्यांनी घसरून 1953.70 डॉलर झाला होता. सध्या सोन्याचा भाव 1940 डॉलर प्रति औंस आहे. रशियाने कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन जोरात सुरु केले आहे.तर इतर देशांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने-चांदीच्या वाढीला ब्रेक लागला आहे.

गुडरिझल्ट या वेबसाईटनुसार आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 51990 रुपये आहे. तर 24 कॅरेटचा भाव 52990 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेटसाठी सोने दर 51860 रुपये असून 24 कॅरेटसाठी 56570 रुपये आहे. कोलकत्त्यात सोन्याचा 22 कॅरेटसाठी 52530 रुपये असून 24 कॅरेटसाठी 55250 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोने 22 कॅरेटसाठी 51570 रुपये असून 24 कॅरेट 56250 रुपये आहे.