MCX : Gold Price ! मागील महिन्यात 4,130 रुपयांनी ‘स्वस्त’ झालं सोनं, चांदीत झाली 10,379 रुपयांची ‘घसरण’, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सोन्याच्या किमतीत या आठवड्यात वाढ झाली आहे. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी, 14 सप्टेंबरला एमसीएक्सवर ऑगस्ट वायदा सोने 51,599 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुले झाले होते. तर, याच्या मागच्या सत्रात 51,319 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. अशाप्रकारे सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात 396 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे.

एमसीएक्सवर चांदीचा भाव या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी, 14 सप्टेंबरला 68,485 रुपये प्रति किलोग्रॅमवर खुला झाला होता. तर, मागच्या सत्रात हा 67,928 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. अशाप्रकारे चांदीच्या भावात या आठवड्यात 51 रुपये प्रति किलोग्रॅमची किरकोळ घसरण नोंदली गेली आहे.

आता मागील महिन्यात सोने-चांदीच्या भावाशी, सध्याच्या किमतीची तुलना करूयात. 6 ऑगसटला ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव 55,845 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावावर बंद झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या सोन्याच्या किंमतीत 4,130 रुपये प्रति 10 ग्रॅमची मंदी आली आहे. अशाच प्रकारे चांदी बाबत बोलायचे तर 10 ऑगस्टला डिसेंबर वायदा चांदीचा भाव 78,256 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या चांदीच्या भावात 10,379 रुपये प्रति किलोग्रॅमची मंदी आली आहे.

आता अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर जाणून घेवूयात. ब्लूमबर्गनुसार, या आठवड्यात अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा डिसेंबर वायदा भाव कॉमेक्सवर 0.63 टक्के किंवा 12.20 डॉलरच्या मोठी वाढीसह 1962.10 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. याशिवाय सोन्याच्या जागतिक हाजीर भावात शुक्रवारी 0.33 टक्के किंवा 6.42 डॉलरच्या वाढीसह 1950.86 डॉलर प्रति औंसवर झाला.

जागतिक स्तरावर चांदीच्या दराचा विचार केला तर, ब्लूमबर्गनुसार, डिसेंबर वायदाच्या चांदीची जागतिक किंमत कॉमेक्सवर शुक्रवारी 0.11 टक्के किंवा 0.03 डॉलरच्या वाढीसह 27.13 डॉलर प्रति औंसवर आणि चांदीची जागतिक हाजीर किंमत 0.93 टक्के किंवा 0.25 डॉलरच्या घसरणीसह 26.78 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

अमेरिकेत रोजगाराचे आकडे खाली आल्याने आणि कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत असल्याने सोने सेफ हेवनच्या रूपात मजबूत झाले आहे. याच कारणामुळे आठवड्याच्या शेवटी सोन्यात तेजीने वाढ दिसून आली आहे. तर, अमेरिकन चलनातील कमजोरीमुळे सुद्धा सोन्याच्या किमतीला सपोर्ट मिळाला आहे. डॉलर निर्देशांक आपल्य प्रतिस्पर्धकांच्या तुलनेत 0.1 टक्के खाली होता, ज्यामुळे अन्य चलनाच्या खरेदीदारांसाठी सोने अधिक आकर्षक झाले.