महागाईमुळं ‘परेशान’ असलेल्या PAK मध्ये सोन्याच्या किंमतीनं मोडले आतापर्यंतचे ‘रेकॉर्ड’, दर जाणून तुम्हाला देखील बसणार नाही ‘विश्वास’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महागाईमुळे त्रस्त पाकिस्तानात सोन्याच्या किंमती सरासरीच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमानुसार, गुरुवारी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमती 105,200 रुपये दर प्रति तोळा झाल्याआहेत. यापूर्वी 24 जून रोजी सोन्याच्या किंमती प्रति तोळा 105,100 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. एएसएसजेएचे अध्यक्ष हाजी हारून रशीद चंद यांनी म्हंटले की, आता पाकिस्तानात सोन्याची खरेदी करणे सर्वसामान्यांच्या हातात राहिले नाही. कारण सर्वसामान्यांना रोजचा खर्च उचलणे अवघड होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत सततच्या अनिश्चिततेमुळे परदेशातूनही गुंतवणूक येत नाही.

का महाग होतेय सोने –
कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार्‍या किंमतींचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला मोठे नुकसान होत आहे. तसेच त्यांच्या जुन्या ऑर्डरची देयके आंतरराष्ट्रीय स्तरावरही अडकली आहेत. ऑल पाकिस्तान जेम्स ज्वेलर्स ट्रेडर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुहम्मद अख्तर खान टेसोरी यांनी वाणिज्य मंत्रालयाला सांगितले की, देशातून निर्यात केलेल्या दागिन्यांसाठी देय रक्कम 120 दिवसांच्या आत मिळावी.

हाजी हारून रशीद चंद यांच्या म्हणण्यानुसार घरगुती सोन्याच्या बाजारासाठी सर्वांत मोठा तणाव फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (एफबीआर) कडून सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर लादलेला भारी कर आहे. यामुळे देशात कोणतीही मागणी शिल्लक नाही. अलीकडेच पाकिस्तानातही अनेक दुकाने बंद झाली आहेत. येत्या काही दिवसांत दुकाने बंद ठेवून आम्ही सरकारच्या विरुद्ध प्रदर्शने करू.

धडकी भरवणारी महागाई –
पाकिस्तान स्टेट बँकेने (एसबीपी) सांगितले की, आम्ही आर्थिक वर्ष 2020 मध्ये जगातील सर्वाधिक महागाई पाहिली आहे, ज्यामुळे आम्हाला व्याज दर वाढविणे भाग पडले आहे. भारत, चीन, बांगलादेश आणि नेपाळसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत पाकिस्तानने सर्वाधिक विकसित महागाईची नोंद केली आहे. किरकोळ बाजारात मूग 220-260 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. त्याचबरोबर हरभराची किंमत प्रति किलो 160 रुपयांवर गेली आहे. याशिवाय साखरेची किंमत 75 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. पाकिस्तान पीबीएसच्या मते महागाईचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.