मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच ‘रेकॉर्डब्रेक’ १३०० रूपयांनी सोनं महागलं !

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन टीम – अर्थसंकल्पानंतर सोन्यावरील टॅक्स वाढवण्यात आला. त्यामुळे दिल्‍लीतील सराफी बाजारात शनिवारी सोन्याचा भाव थेट 1300 रूपयांनी वाढला. सोनं प्रति 10 तोळा 35 हजार 470 रूपयांवर पोहचंलं. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव हा 35 हजाराहून अधिक गेला आहे. अर्थसंकल्पात सीमा शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सोन्याच्या भावात आज जबरदस्त तेजी पहावयास मिळाली. दरम्यान, चांदीच्या भावांमध्ये देखील 280 रूपयांची वाढ झाली असून चांदीचा दर हा प्रति किलोग्रॅम 38 हजार 800 रूपयांवर पोहचला आहे.

280 रूपयांनी वाढले चांदीचे वाढ
दिल्‍लीच्या स्थानिक बाजारामध्ये स्टॅन्डर्ड सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम हा 1300 रूपयांनी वाढला असून तो 35 हजार 470 वर जावून पोहचला आहे. चांदीच्या भावात देखील या आठवडयातील सर्वाधिक 280 रूपयांची वाढ प्रति किलोग्रॅम झाली आहे. दरम्यान, विदेशात सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. आगामी काळात देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !